ETV Bharat / bharat

Rahul Gandhi visit to Manipur : हिमंता बिस्वा सरमांनी राहुल गांधींना फटकारले, म्हणाले हा तर दुःखद परिस्थितीत राजकीय फायद्याचा प्रयत्न - मणिपूर हिंसाचार

राहुल गांधी यांनी हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये भेट दिल्यामुळे चांगलेच राजकारण तापले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांच्या मणिपूर भेटीवरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील दुःखद परिस्थितीचा कोणीही राजकीय फायदा घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Manipur Violence
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 30, 2023, 11:54 AM IST

गुवाहाटी : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट दिली आहे. या भेटीवरुन मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांनी राहुल गांधींना चांगलेच फटकारले आहे. हिंसाचाराच्या काळात राहुल गांधींचा मणिपूर दौरा म्हणजे माध्यमांमधील प्रचाराशिवाय दुसरे काही नाही. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिपूरमधील दुःखद परिस्थितीतून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हिमंता बिस्वा सरमा यांनी केला. मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहेत. त्यामुळे राहुल गांधींच्या एकदिवसीय दौऱ्याने या प्रदेशात काहीही बदल होणार नसल्याचेही हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.

दुःखद परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये : कोणत्याही राज्यात अशी स्थिती निर्माण झाली तर, अशा दुःखद परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये, असेही हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्ट केले. हिमंता बिस्वा सरमा यांनी मणिपूरमधील संघर्ष करणाऱ्या कुकी आणि मेईतेई समुदायांची दोन छायाचित्रे शेअर केली. त्यावर 'मणिपूरमधील परिस्थिती करुणेच्या माध्यमातून मतभेद दूर करण्याची मागणी करते. एखाद्या राजकीय नेत्याने आपल्या तथाकथित भेटीचा उपयोग वाद निर्माण करणे देशाच्या हिताचे नाही, असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

  • #WATCH | Assam CM Himanta Biswa Sarma on Congress leader Rahul Gandhi's visit to Manipur, says, "...Considering the situation in Manipur, the central & state government are responsible to bring the situation there under control...There is no need for any political leader to go… pic.twitter.com/6eLJl1Miub

    — ANI (@ANI) June 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शांततेसाठी आलो, मात्र सरकार मला रोखत आहे : राहुल गांधींनीही मणिपूर दौऱ्याबाबत ट्विट केले असून मी मणिपूरच्या माझ्या सर्व बंधू-भगिनींना ऐकण्यासाठी आल्याचे त्यामध्ये नमूद केले आहे. सर्व समाजातील नागरिक खूप प्रेमळपणे स्वागत करत असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. मात्र दुर्दैवाने सरकार मला रोखत आहे. मणिपूरला उपचाराची गरज आहे, शांतता ही आपली एकमेव प्राथमिकता असली पाहिजे असेही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. गुरुवारी चुराचंदपूर येथील एका मदत शिबिराला भेट देत असताना राहुल गांधींचा ताफा रस्त्याच्या मधोमध थांबवण्यात आला. मणिपूर संघर्षातील पीडितांना भेटण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टरने चुराचंदपूर येथील मदत छावणीत जाण्याचा निर्णय घेतला होता.

  • Situation in Manipur demands bridging differences through compassion. It’s not in nation’s interest for a political leader to use his so called visit to exacerbate fault lines.

    Both the Communities of the State have clearly rejected such attempts. pic.twitter.com/MZaZIVQS55

    — Himanta Biswa Sarma (@himantabiswa) June 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -

  1. Manipur Violence : राहुल गांधी हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये जाणार, मदत छावण्यांमधील लोकांची घेणार भेट
  2. Rahul Gandhi Manipur Visit : काँग्रेस नेते राहुल गांधींचा ताफा मणिपूरमध्ये पोलिसांनी अडवला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.