ETV Bharat / bharat

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेसाठी राहुल गांधी आसाम दौऱ्यावर

आसाम विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राहुल गांधी यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्यासाठी आसाममध्ये काँग्रेस पाच पक्षांशी युती करेल, अशी घोषणा काँग्रेसने मागील महिन्यात केली आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी
author img

By

Published : Feb 14, 2021, 11:46 AM IST

नवी दिल्ली - आसाम विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. आज (रविवार) काँग्रेस प्रचार मोहिमेला सुरुवात करणार असून राहुल गांधी आसाम दौऱ्यावर गेले आहेत. ते शिवसागर येथे रॅलीला संबोधित करणार आहे.

भाजपाला आव्हान देण्यासाठी पाच पक्षांशी युती-

आसाम विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राहुल गांधी यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्यासाठी आसाममध्ये काँग्रेस पाच पक्षांशी युती करेल, अशी घोषणा काँग्रेसने मागील महिन्यात केली आहे. केंद्रीय कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलन देशात गाजत असताना राहुल गांधी आजच्या रॅलीत कोणत्या विषयावर बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदासुद्धा या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा ठरणार आहे.

आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रुपीन बोरा यांनी मागील महिन्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ते म्हणाले होते की, आगामी आसाम विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटीक फ्रँट, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया(सीपीआय), सीपीआय (मार्क्सवादी, सीपीआय(मार्क्स-लेनिनवादी) आणि आंचलिक गण मोर्चा भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी मिळून निवडणुका लढतील.

एप्रिल-मे महिन्यात १२६ सदस्यांच्या आसाम विधासभेसाठी निवडणुका होणार आहे. मात्र, निवडणुकीचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नाही. त्याआधीच राजकीय पक्षांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.