ETV Bharat / bharat

Rahul Gandhi Defamation Case: शिक्षेच्या विरोधात राहुल गांधी करणार अपील , उद्या सुरतला जाण्याची शक्यता - गुजरात न्यायालयात अपील

राहुल गांधी सोमवारी सुरतला पोहोचणार आहेत. या निर्णयाला ते सुरतच्या जिल्हा न्यायालयात आव्हान देणार आहेत, ज्या अंतर्गत त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निर्णयामुळे राहुल गांधींचे संसद सदस्यत्व संपुष्टात आले आहे.

Rahul Gandhi to file appeal in Gujarat court on April 3 against conviction in defamation case
शिक्षेच्या विरोधात राहुल गांधी अपील करण्याच्या तयारीत, उद्या सुरतला जाण्याची शक्यता
author img

By

Published : Apr 2, 2023, 2:05 PM IST

Updated : Apr 2, 2023, 2:48 PM IST

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मानहानीच्या खटल्यातील त्यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला आव्हान देणार आहेत. ते सोमवारी गुजरातला पोहोचणार असून सुरतच्या सत्र न्यायालयात दाद मागणार आहे. 11 दिवसांपूर्वी मोदी आडनाव प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. कर्नाटकातील सभेत राहुल गांधी यांनी ही टिप्पणी केली होती. राहुल गांधींनी माफी मागण्यास नकार दिला. न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व संपले असून, त्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीसही मिळाली आहे.

जिल्हा न्यायालयात दाद मागणार: लोकप्रतिनिधी कायद्यात अशी तरतूद आहे की, कोणत्याही खासदार किंवा आमदाराला दोन वर्षे किंवा दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास त्याचे सदस्यत्व आपोआप संपते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी सोमवारी दुपारी 12.30 वाजता सुरत कोर्टात पोहोचू शकतात. सीजेएम न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ते जिल्हा न्यायालयात दाद मागणार आहेत. यावेळी हजारो काँग्रेस कार्यकर्ते न्यायालयाच्या बाहेर उपस्थित राहणार असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधींचे स्वागत करतील. गुजरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासोबत राहू शकतात. जी काही कागदपत्रे तयार करायची होती, ती तयार केली आहेत, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले.

23 मार्च रोजी राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या कायदेशीर सल्लागारांनी या निर्णयाला आव्हान देण्यास विलंब केला. किंबहुना, या निर्णयाला आव्हान देण्यास जेवढा उशीर होईल, तेवढा राजकीय फायदा काँग्रेस आणि राहुल गांधींना मिळेल, असे मानले जात होते. न्यायालयाने राहुल गांधींना ३० दिवसांची मुदत दिली होती, या कालावधीत राहुल गांधी या निर्णयाला आव्हान देऊ शकतात.

राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून खासदार होते. त्यांना जिल्हा न्यायालयातून दिलासा मिळाल्यास त्यांचे कायदेशीर स्थान भक्कम होऊ शकते. मात्र, त्यांचे संसद सदस्यत्व बहाल होईल की नाही, याबाबत काहीही सांगता येणार नाही, कारण उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कायदेशीर प्रक्रिया सुरूच राहणार आहे. CJM कोर्टाच्या निकालानंतर राहुल गांधींनी मीडियाशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की, ते सावरकर नाहीत, ते गांधी आहेत आणि गांधी माफी मागत नाहीत.

हेही वाचा: नवज्योत सिंग सिद्धू तुरुंगाच्या बाहेर, मुसेवालाच्या कुटुंबियांना भेटणार

Last Updated : Apr 2, 2023, 2:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.