ETV Bharat / bharat

Congress Plenery Session : आरएसएस आणि भाजप सत्तेसाठी काहीही करू शकतात - राहुल गांधी - कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन

छत्तीसगडमधील काँग्रेस अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पक्षाच्या प्रतिनिधींना संबोधित केले. राहुल गांधीनी भाजप सत्तेसाठी काहीही करू शकतो असे म्हटले तर प्रियांका गांधींनी कार्यकर्त्यांना एकत्र लढण्याचे आवाहन केले.

Congress Plenery Session
राहुल गांधी प्रियंका गांधी
author img

By

Published : Feb 26, 2023, 1:33 PM IST

रायपूर (छत्तीसगड) : कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाषण करताना राहुल गांधींनी संघ आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. आरएसएस आणि भाजप सत्तेसाठी काहीही करू शकतात, असे राहुल गांधी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, भारताचे मंत्री चीनचे कौतुक करत आहेत. ही कसली देशभक्ती आहे?

'काश्मीरमध्ये सगळीकडे तिरंगा दिसला' : भारतातील सर्वात जास्त दहशतवादग्रस्त जिल्ह्यात फक्त तिरंगा दिसतो आहे, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. ते म्हणाले की, काश्मीर खोऱ्यात 2000 लोक येतील असे पोलिसांनी सांगितले होते, पण आम्ही खोऱ्यात प्रवेश केला तेव्हा 40 हजार लोक उपस्थित होते. भारतातील सर्वाधिक दहशतवादग्रस्त जिल्ह्यात आम्हाल फक्त तिरंगा दिसत होता. सगळीकडे काश्मीरच्या तरुणांच्या हातात तिरंगाच होता. सीआरपीएफच्या जवानांनी देखील आश्चर्याने म्हटले की, आम्ही आजपर्यंत असे काहीही पाहिले नाही.

प्रियंका गांधींचे कार्यकर्त्यांना संबोधन : रायपूर काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या की, 'आमच्या संघटनेसमोर मोठे आव्हान आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही जमलो आहोत. काँग्रेसचे कार्यकर्ते अनोखे आहेत. ते कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत झेंडा घेऊन चालत गेले. असे अनेक कार्यकर्ते आहेत जे अधिवेशनात उपस्थित नाहीत. अशा कार्यकर्त्यांना आम्हाला एकजुटीने लढण्याचा संदेश द्यायचा आहे.

'सरकारचे गरिबांकडे लक्ष नाही' : प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या की, 'आपल्याला आपल्या तक्रारी बाजूला ठेवल्या पाहिजेत. सर्वांना एकजुटीने लढायचे आहे. एकत्र काम करायचे आहे. आज तरुणांना रोजगार नाही. शेतकरी अडचणीत आहेत, पण पंतप्रधान आपल्या मित्रांना मोफत जमीन देत आहेत. देशातील निवडक उद्योगपतींचे उत्पन्न वाढत आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही, तर बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले जात आहे'.

'लोकांच्या आमच्याकडून मोठ्या अपेक्षा' : प्रियांका गांधी यांनी सांगितले की, 'लोकांना आमच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. ज्यांची विचारधारा भाजपपेक्षा वेगळी आहे, त्यांनी सर्वांनी एकत्र यायला हवे. आपण एकजुटीने आणि निष्ठेने कोणतेही कठीण काम करू शकतो. रोजगार, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर निवडणुका लढवल्या पाहिजेत. सध्या देशात नकारात्मक वातावरण आहे. आपण आपला मुद्दा सकारात्मक पद्धतीने ठेवला पाहिजे.

'उज्वल भविष्यासाठी एकत्र लढावे लागेल' : प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधताना सांगितले की, 'सरकारने आमचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना दडपून ठेवले आहे. छत्तीसगडमध्येही ईडीचे छापे झाले आहेत. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये किती हिंमत आहे हे आम्हाला माहीत आहे. भक्कम भविष्यासाठी आपल्याला एकत्र लढायचे आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मनात आणले तर ते काहीही साध्य करू शकतात.

हेही वाचा : Congress plenary session : '75 वर्षात असे कधीच झाले नाही', पंजाबमधील हिंसेवरून काँग्रेसची सरकारवर जोरदार टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.