नई दिल्ली - राहुल गांधी यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद देणे गरजेचे आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस आणखी मजबूत होईल, असे मत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी व्यक्त केले. रविवारी (दि. 13 मार्च) पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
ते म्हणाले, मागील तीन दशकांपासून गांधी कुटुंबातील एकही व्यक्ती मंत्री किंवा पंतप्रधान झालेले नाही. यावरुनच पक्षावर त्यांचा असलेली निष्ठा समजते. एकता व अखंडता हे आपल्या काँग्रेसचा मार्ग आहे. पण, जात, धर्म व त्याचे ध्रुवीकरण हे मार्ग भाजपचे आहे. दोन समाजात किंवा जातीत द्वेष पसरवणे सोपे असते, पण दोन समाजात जातीय सलोखा निर्माण करणे खूप अवघड असते. काँग्रेस नेहमी सलोखा व धर्मनिरपेक्षित राहिलेली आहे, असेही गहलोत म्हणाले.
पंजाबमधील पराभव अंतर्गत वादामुळेच - अशोक गहलोत म्हणाले, 2017 साली काँग्रेस पंजाबमध्ये बहुमताने निवडून आली व सत्ता स्थापन केली. चरणजीतसिंग चन्नी हे मुख्यमंत्री झाल्यानंतरही परस्थिती चांगलीच होती. मात्र, पक्षातील अंतर्गत वादामुळे काँग्रेस पंजाब विधानसभा निवडणूक पराभूत झाली.
काँग्रेस संसदीय रणनीती समूह ( Congress Parliamentary Strategy Group ) ची बैठक आज (रविवार) नवी दिल्लीती 10 जनपथ येथे झाली. या बैठकीत सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या दुसऱ्या सत्रात काँग्रेसची रणनितीवर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या एमएसपी (MSP), बेरोजगारी, यूक्रेनमधून परलेले वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, आनंद शर्मा, मनिकम टागोर, के सुरेश व जयराम रमेश हे उपस्थित होते.