नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) काठमांडूतील एका नाईट क्लबमध्ये ( Rahul Gandhi Viral Video ) असतानाचा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे. यात राहुल गांधी एका डिस्कोमध्ये असून इतर लोक मद्य सेवन करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला ( Congress Spokesperson Randeep Surjewala ) यांनी, मित्रपरिवाराच्या कुटुंबांच्या लग्नसमारंभाला उपस्थित राहणे हे सभ्यतेचे लक्षण असल्याचे सांगत भाजपवर निशाणा साधला आहे.
-
Rahul Gandhi seen at nightclub in viral video
— ANI Digital (@ani_digital) May 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/V9gLQc7lgd#RahulGandhi #Congress #ViralVideo pic.twitter.com/p0aM5PDHKU
">Rahul Gandhi seen at nightclub in viral video
— ANI Digital (@ani_digital) May 3, 2022
Read @ANI Story | https://t.co/V9gLQc7lgd#RahulGandhi #Congress #ViralVideo pic.twitter.com/p0aM5PDHKURahul Gandhi seen at nightclub in viral video
— ANI Digital (@ani_digital) May 3, 2022
Read @ANI Story | https://t.co/V9gLQc7lgd#RahulGandhi #Congress #ViralVideo pic.twitter.com/p0aM5PDHKU
या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका नाईट क्लबमध्ये आपल्या मैत्रिणीसोबत दिसत आहेत. यावेळी तिथे म्युझिक सुरु असून इतर लोक डान्स करताना दिसत आहे. तसेच मद्यपानही करत आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आणि विविध नेत्यांनी तोंडसुख घेतले आहे.
हा व्हिडिओ झाला व्हायरल
नेपाळची राजधानी असणाऱ्या काठमांडूमधील हा प्रसिध्द नाईट क्लब आहे. काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, राहुल गांधी सोमवारी दुपारी नेपाळच्या राजधानीत दाखल झाले होते. म्यानमारमधील नेपाळचे माजी राजदूत भीम उदास यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने राहुल गांधींना लग्नाचे आमंत्रण दिले होते. सीएनएनची माजी वार्ताहर असलेली उदास यांची मुलगी सुम्निमा या निमा मार्टिन शेर्पा यांच्याशी लग्न करत आहे. त्यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी काठमांडूला गेले होते.
हेही वाचा - Review Meeting of Congress Leaders : आढावा बैठकीनंतर काँग्रेस होणार आक्रमक
-
Rahul Gandhi went to a friendly country Nepal to participate in a pvt marriage function of a friend who also happens to be a journalist... last I checked, having family & friends & attending marriage ceremonies is a matter of our culture &civilization: Randeep Surjewala, Congress pic.twitter.com/zAF1Ec0MEt
— ANI (@ANI) May 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Rahul Gandhi went to a friendly country Nepal to participate in a pvt marriage function of a friend who also happens to be a journalist... last I checked, having family & friends & attending marriage ceremonies is a matter of our culture &civilization: Randeep Surjewala, Congress pic.twitter.com/zAF1Ec0MEt
— ANI (@ANI) May 3, 2022Rahul Gandhi went to a friendly country Nepal to participate in a pvt marriage function of a friend who also happens to be a journalist... last I checked, having family & friends & attending marriage ceremonies is a matter of our culture &civilization: Randeep Surjewala, Congress pic.twitter.com/zAF1Ec0MEt
— ANI (@ANI) May 3, 2022
कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांचे स्पष्टीकरण
राहुल गांधींचा काठमांडूचा नाईट क्लबमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यावर यावर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी त्यावर ट्विटरद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. राहुल गांधी नेपाळमध्ये एका पत्रकार मित्राच्या विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते. कुटुंब आणि मित्राच्या लग्न समारंभांना उपस्थित राहणे ही आपल्या संस्कृती आणि सभ्यतेची बाब आहे.
-
But do let me know so that we can change our status & civilizational practices of attending marriages of our friends & family members: Randeep Singh Surjewala, Congress General Secretary, on Congress leader Rahul Gandhi's recent viral video pic.twitter.com/Sot1oRifR7
— ANI (@ANI) May 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">But do let me know so that we can change our status & civilizational practices of attending marriages of our friends & family members: Randeep Singh Surjewala, Congress General Secretary, on Congress leader Rahul Gandhi's recent viral video pic.twitter.com/Sot1oRifR7
— ANI (@ANI) May 3, 2022But do let me know so that we can change our status & civilizational practices of attending marriages of our friends & family members: Randeep Singh Surjewala, Congress General Secretary, on Congress leader Rahul Gandhi's recent viral video pic.twitter.com/Sot1oRifR7
— ANI (@ANI) May 3, 2022
या देशात लग्न समारंभाला उपस्थित राहणे ही गोष्ट गुन्हा ठरलेली नाही. कदाचित आजच्या घटनेनंतर भाजप मित्राच्या लग्नाला जाणे बेकायदेशीर ठरवेल. याबद्दल पण मला कळवा. आम्ही आमच्या मित्रपरिवाराच्या आणि कुटुंबाच्या लग्नाला उपस्थित राहण्याची परंपरा बदलायची का?, असे सवाल करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा - Rahul Gandhi's visit to Telangana : राहुल गांधी तेलंगणा दौऱ्यावर, 'असा' आहे दौरा