ETV Bharat / bharat

Rahul Gandhi : खासदारकीपाठोपाठ बंगलाही परत मिळाला, राहुल गांधी म्हणतात..

राहुल गांधी यांना त्यांचा १२ तुघलक लेन येथील जुना सरकारी बंगला परत मिळाला आहे. मार्चमध्ये खासदारकी गेल्यानंतर त्यांना हा बंगला सोडावा लागला होता. ते या बंगल्यात 2004 पासून राहत आहेत.

Rahul Gandhi
राहुल गांधी
author img

By

Published : Aug 8, 2023, 9:34 PM IST

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेचे सदस्यत्व बहाल करण्यात आल्यानंतर मंगळवारी त्यांना त्यांचा जुना सरकारी बंगला परत देण्यात आला. संसदेच्या सभागृह समितीने या संदर्भात निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. आता राहुल गांधी यांना त्यांचा १२ तुघलक लेन येथील जुना बंगला पुन्हा देण्यात आला आहे.

'संपूर्ण हिंदुस्थानच माझे घर आहे' : याबाबत राहुल गांधी यांना विचारले असता, 'संपूर्ण हिंदुस्थानच माझे घर आहे', असे ते म्हणाले. मोदी आडनावाशी संबंधित मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली होती. त्यानंतर सोमवारी लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे त्यांना लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले. यामुळे आता राहुल गांधी यांचा लोकसभेत मोदी सरकारवरील अविश्वास प्रस्तावावर बोलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तीन महिन्यानंतर निवासस्थानी परतले : मार्चमध्ये गुजरात न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली, ज्यामुळे त्यांची खासदारकी गेली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी 22 एप्रिल रोजी दिल्लीतील 12 तुघलक लेन येथील त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे केले. विशेष म्हणजे, या बंगल्यात ते जवळपास दोन दशके राहत होते. न्यायालयाच्या या निकालानंतर राहुल गांधी जवळपास तीन महिन्यानंतर त्यांच्या निवासस्थानी परतले आहेत.

  • #WATCH | "Mera ghar poora Hindustan hai," says Congress MP Rahul Gandhi when asked for a reaction on media reports about getting back his official residence as an MP

    He has arrived at the AICC Headquarters for a meeting with the leaders of Assam Congress. pic.twitter.com/KtIzZoRPmm

    — ANI (@ANI) August 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राहुल गांधी लोकसभेत वायनाडचे प्रतिनिधित्व करतात : राहुल गांधी 2004 मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशातील अमेठीमधून खासदार म्हणून निवडून आले होते. ते या जागेवरून तीन वेळा खासदार राहिले आहेत. मात्र 2019 मध्ये भाजपाच्या स्मृती ईराणी यांनी त्यांचा तेथे पराभव केला. 2019 मध्येच त्यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. ते सध्या लोकसभेत वायनाडचे प्रतिनिधित्व करतात.

  • Rahul Gandhi has got an official confirmation from the Estate office for the allotment of a bungalow to him as an MP in Delhi. For now, he has been offered 12, Tughlak Lane, his earlier residence, but he is yet to decide on it. The Cong MP has 8 days to respond to this: Congress… pic.twitter.com/qCrHEFzfaV

हेही वाचा :

  1. No Confidence Motion : अविश्वास प्रस्ताव असतो तरी काय? मोदी सरकारला याचा खरंच धोका आहे का, जाणून घ्या सर्वकाही
  2. Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो-२ यात्रेचा ठरला मार्ग, वाचा कसा असेल झंझावात
  3. Rahul Gandhi : राहुल गांधींचा संसदेत 'कमबॅक', अविश्वास प्रस्तावावरील चर्चेतही होणार सहभागी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.