ETV Bharat / bharat

Rahul Gandhi Agneepath : 4 वर्षांच्या करारावर निवृत्त होणाऱ्या हजारो अग्निवीरांचे भविष्य काय असेल? राहुल गांधींचा सवाल

author img

By

Published : Jul 24, 2022, 11:18 AM IST

भारतीय हवाई दलातील अग्निवीरवायू भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया ( Agneepath scheme registration ) संपली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी 24 जून ते 5 जुलै या कालावधीत झाली. यासाठी हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी करण्यात आली होती. या योजनेवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi
राहुल गांधी

हैदराबाद- अग्नीपथ योजनेवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. दरवर्षी 60,000 सैनिक निवृत्त होतात, त्यापैकी फक्त 3000 सैनिकांना सरकारी नोकऱ्या मिळतात. 4 वर्षांच्या करारावर निवृत्त होणाऱ्या हजारो अग्निवीरांचे भविष्य काय असेल? असा प्रश्न काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला ( Rahul Gandhi on Agnipath scheme ) विचारला आहे.

अग्नीपथ योजनेवरून काँग्रेस सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहे. पंतप्रधानांच्या प्रयोगशाळेच्या या नव्या प्रयोगामुळे देशाची सुरक्षा आणि तरुणांचे भविष्य दोन्ही धोक्यात आले आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

  • 60,000 सैनिक हर साल रिटायर होते हैं, उनमें से सिर्फ 3000 को सरकारी नौकरी मिल रही है।

    4 साल के ठेके पर हज़ारों की संख्या में रिटायर होने वाले अग्निवीरों का भविष्य क्या होगा?

    प्रधानमंत्री की प्रयोगशाला के इस नए Experiment से देश की सुरक्षा और युवाओं का भविष्य दोनों खतरे में हैं।

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) July 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारतीय हवाई दलातील अग्निवीरवायू भरतीसाठी नोंदणी ( Army on Agneepath scheme ) प्रक्रिया संपली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी 24 जून ते 5 जुलै या कालावधीत झाली. यासाठी हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी करण्यात आली होती. आता भारतीय हवाई दलाने ट्विट करून माहिती दिली आहे की, या भरतीसाठी विक्रमी 7,49,899 उमेदवारांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंत कोणत्याही भरती चक्रात सर्वाधिक 6,31,528 अर्जांची नोंदणी झाली होती.

२५ टक्के उमेदवार होणार कायम : अग्निपथ योजनेची घोषणा झाल्यानंतर देशभरातील तरुणांनी याला विरोध दर्शवला होता. असे असतानाही मोठ्या संख्येने तरुणांनी अग्निवीर होण्यासाठी अर्ज केले आहेत. लष्कराने अग्निवीर भरती रॅलीची अधिसूचनाही जारी केली असून नौदलातही अग्निवीरांच्या भरतीसाठी अर्ज सुरू आहेत. अग्निपथ योजनेंतर्गत, उमेदवारांना कोणत्याही सैन्यात केवळ 4 वर्षांसाठी भरती केली जाईल, त्यानंतर, आवश्यक असल्यास, जास्तीत जास्त 25 टक्के उमेदवार कायमस्वरूपी होऊ शकतात.

अग्निपथ लष्करी भरती योजनेंतर्गत सैन्यदलात सामील होऊ इच्छिणाऱ्या संभाव्य अर्जदारांसाठी भारतीय लष्कराने रविवारी अटी आणि शर्ती आणि संबंधित तपशील जारी केले. लष्कराने सांगितले की 'अग्निवीर' भारतीय सैन्यात एक वेगळी रँक तयार करतील. इतर कोणत्याही विद्यमान रँकपेक्षा ती वेगळी असेल आणि त्यांना कोणत्याही रेजिमेंट आणि युनिटमध्ये पोस्ट केले जाऊ शकते.

गोपनियतेचा नियम लागू - जाहीर केलेल्या निवेदनात ( terms and conditions for Agniveers ) म्हटले आहे की, 'अग्निवीरांना' चार वर्षांच्या सेवेच्या कालावधीत मिळवलेली वर्गीकृत माहिती अधिकृत गुप्तता कायदा, 1923 अंतर्गत कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा स्त्रोताला उघड करण्यास प्रतिबंधित केले जाईल. "ही योजना सुरू केल्यामुळे, नियमित केडरमध्ये सैनिकांची नोंदणी वैद्यकीय शाखेतील तांत्रिक केडर वगळता भारतीय सैन्यात केवळ अग्निवीर म्हणून कामाचा कालावधी पूर्ण केलेल्या जवानांसाठीच उपलब्ध असेल,”.

मध्येच सेवा सोडण्याची तरतूद - त्यामध्ये असेही म्हटले आहे की, अटी पूर्ण होण्यापूर्वी अग्निवीरला स्वतःच्या विनंतीनुसार सैन्य सोडण्याची परवानगी नाही. "तथापि, बर्‍याच अपवादात्मक प्रकरणांमध्ये, सक्षम प्राधिकाऱ्याने मंजूरी दिल्यास, या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांना सोडले जाऊ शकते". 14 जून रोजी जाहीर झालेल्या अग्निपथ योजनेत 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना फक्त चार वर्षांसाठी भरती करण्याची तरतूद आहे. त्यातील 25 टक्के तरुणांना आणखी 15 वर्षे सेवेत ठेवण्याची तरतूद आहे. नंतर सरकारने 2022 मध्ये भरतीसाठी उच्च वयोमर्यादा 23 वर्षे केली.

हेही वाचा-Rajnath Singh : पत्रकाराने प्रश्न विचारताच राजनाथ सिंग यांचा आवाज चढला.. म्हणाले, 'हे तर ब्रिटिशकालीनच..'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.