पणजी: काँग्रेस नेते राहुल गांधी आज गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत, सकाळी 10 वाजता ते गोव्यात दाखल होतील, ते विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात अभासी संवाद साधणार आहेत. जवळील मुरगाव मतदारसंघात ते काँग्रेस उमेदवार चा घरोघरी जाऊन प्रचार करतील. राहुल यांच्यानंतर प्रियांका गांधी, सोनिया गांधी काँग्रेसचे इतर बडे नेते प्रचारासाठी गोव्यात दाखल होणार आहेत
राहुल गांधींचा दौरा
• 10:30 वाजता: सडा, मुरगाव विधानसभा येथे घरोघरी प्रचार
• 12:30 वा: इंटरनॅशनल सेंटर, डोना पॉला येथे उमेदवारांसोबत बैठक
• 14:15 वाजता - डोना पॉला येथे पर्यटन प्रतिनिधी, सीआयआय प्रतिनिधींसोबत बैठक
• 16:15 - सांखळी म्युनिसिपल ग्राउंड, सांखळी, सांकेलीम येथे "निर्धार" व्हर्च्युअल रॅली