आंबटपल्ली (तेलंगणा) Rahul Gandhi in Telangana : काँग्रेस नेते राहुल गांधी गेले तीन दिवस तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज तिसऱ्या दिवशी जयशंकर यांच्या भूपालपल्ली जिल्ह्याच्या दौऱ्याचा एक भाग म्हणून अंबटपल्ली, महादेवपूर मंडल इथं आयोजित महिला सक्षमीकरण परिषदेत भाग घेतला. अभिजातांचे तेलंगण आणि जनतेचं तेलंगण यांच्यात निवडणुका सुरू असून तेलंगणातील संपत्तीचं शोषण होत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय.
-
LIVE: Mahila Sadassu | Ambatpally Village, Telangana https://t.co/ZPNhNfWpir
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">LIVE: Mahila Sadassu | Ambatpally Village, Telangana https://t.co/ZPNhNfWpir
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 2, 2023LIVE: Mahila Sadassu | Ambatpally Village, Telangana https://t.co/ZPNhNfWpir
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 2, 2023
केसीआर सरकारवर जोरदार टीका : याठिकाणी बोलताना राहुल गांधींनी केसीआरवर जोरदार हल्लाबोल केलाय. कालेश्वरम प्रकल्प केसीआरसाठी एटीएमसारखा झाला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसंच बीआरएस सरकार तेलंगणातील जनतेच्या पैशांचं शोषण करत असल्याची टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, काँग्रेस सत्तेवर आल्यावर स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर 500 रुपयांना देईल. केसीआर यांनी चोरलेले पैसे महिलांच्या खात्यात टाकले जातील. महिलांना टीएसआरटीसी बसमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात येणार, महालक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक महिलेला अडीच हजार रुपये देण्यात येणार आहेत. बीआरएस, एमआयएम आणि भाजपा हे तीन पक्ष सोबतच उभे आहेत, असा आक्षेप त्यांनी घेतला. त्यामुळंच या निवडणुकीत काँग्रेसला विजयी करून जनतेचं सरकार बनवा, असं राहुल गांधी यांनी जनतेला सांगितलं.
"केसीआरने चोरलेले पैसे आम्ही महिलांच्या खात्यात टाकू. आम्ही आरटीसी बसमध्ये महिलांना मोफत प्रवास देऊ. आम्ही महालक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक महिलेला 2,500 रुपये देऊ. बीआरएस, एमआयएम आणि भाजपा हे तिन्ही एकच पक्ष आहेत." - राहुल गांधी, काँग्रेस नेते
अनेक स्थानिक नेते सहभागी : या कार्यक्रमात तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे, पीसीसी अध्यक्ष रेवंत रेड्डी, सीएलपी नेते भट्टी विक्रमार्का, श्रीधर बाबू सहभागी झाले होते. सभेनंतर राहुल गांधी यांनी मेडिगड्डा बॅरेजची पाहणी केली. तसंच त्यांनी तेथील लोकांना बॅरेज कोसळण्याचं कारण विचारलं. तर दुसरीकडे पोलिसांनी बॅरेजवर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. बॅरेज परिसरात कलम 144 लागू केलेलं आहे.
हेही वाचा :
- Rahul Gandhi targets Adani Group : 'अदानीं'कडून ३२ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा राहुल गांधींचा दावा, अदानी-शरद पवार भेटीबाबत म्हणाले...
- Sharad Pawar Meeting : शरद पवारांनी घेतली खरगे, राहुल गांधींची भेट, INDIA आघाडीच्या रणनीतीवर चर्चा
- Rahul Gandhi Interaction Porters : देशाचं ओझं वाहणारे आज सक्तीनं ओझ्याखाली दबले, हमालांच्या दुर्व्यवस्थेबद्दल राहुल गांधींची खंत