पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीच्या ( Goa Assembly Election ) प्रचाराची धुमश्चक्री आता जोरदार सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi In Goa ) यांनी मुरगावमध्ये पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ घरोघरी जाऊन प्रचार केला. यानंतर ते इंटरनॅशनल सेंटर, डोना पॉला येथे उमेदवारांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती आहे.
राहुल गांधी यापूर्वी 2 फेब्रुवारीला गोवा दौऱ्यावर येणार होते. पण, संसदीय कार्यामुळे त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. आज सकाळी राहुल गांधी पणजीत दाखल झाले. राहुल गांधी आज आपल्या दौऱ्यात घरोघरी प्रचारासह पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी, अंगणवाडी कर्मचारी आणि इतरांशी ते संवाद साधणार आहेत. याशिवाय ते कार्यकर्त्यांच्या सभांना संबोधित करणार असून काँग्रेसच्या उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत.
-
#WATCH | Goa polls: Congress leader Rahul Gandhi meets a family during his door-to-door campaign in support of party candidate in Mormugao. pic.twitter.com/WSAJTWPtFT
— ANI (@ANI) February 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Goa polls: Congress leader Rahul Gandhi meets a family during his door-to-door campaign in support of party candidate in Mormugao. pic.twitter.com/WSAJTWPtFT
— ANI (@ANI) February 4, 2022#WATCH | Goa polls: Congress leader Rahul Gandhi meets a family during his door-to-door campaign in support of party candidate in Mormugao. pic.twitter.com/WSAJTWPtFT
— ANI (@ANI) February 4, 2022
गोव्याचे राजकारण....
गोवा विधानसभा निवडणूक 2022 (Goa Assembly Election 2022) साठी बिगुल वाजले आहेत. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अनेकवेळा गोव्यात त्रिशंकू विधानसभा (Hung Assembly in Goa) झाली होती. मात्र, यावेळी त्रिशंकू होणार की भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. गोवा विधानसभा निवडणुकी 2022 साठी व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार (Goa to vote on February 14) आहे. गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होणार की त्रिशंकू विधानसभा होणार हे 10 मार्चला कळणार आहे.
हेही वाचा - Goa Assembly Election: गोव्याच्या राजकारणात महिलांना नगण्य स्थान