ETV Bharat / bharat

Rahul Gandhi: राहुल गांधी यांची आजची 'ED'चौकशी संपली; उद्या पुन्हा होणार चौकशी - राहुल गांधी चौकशीच्या दुसऱ्या फेरीसाठी EDकार्यालयात दाखल

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिवसभरात सुमारे साडेआठ तास चौकशी करण्यात आली. ( Rahul Gandhi ED Inquiry ) त्यानंतर राहुल गांधींची ईडीची चौकशी संपली आहे. ED'ने राहुल यांना उद्या पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी
author img

By

Published : Jun 13, 2022, 3:50 PM IST

Updated : Jun 13, 2022, 10:53 PM IST

नवी दिल्ली - नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिवसभरात सुमारे साडेआठ तास चौकशी करण्यात आली. राहुल यांना सकाळी पहिल्या फेरीत ED'कडून तीन तास चौकशी झाली. त्यानंतर लंच ब्रेकमध्ये राहुल सोनिया गांधींना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. येथून ते पुन्हा ईडीच्या कार्यालयात पोहोचले. त्यानंतर सुमारे साडेपाच तास ही चौकशी झाली. त्यानंतर राहुल गांधींची ईडीची चौकशी संपली आहे. ED'ने राहुल यांना उद्या पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.

  • Congress leader Rahul Gandhi has been asked to rejoin the National Herald investigation again tomorrow: Sources

    (File photo) pic.twitter.com/lAqMsbA0tn

    — ANI (@ANI) June 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आज दिवसभरात काय घडले - राहुल गांधी यांना जेवणासाठी वेळ देण्यात आला होता. त्यानंतर राहुल सोनीया गांधी ज्या गंगाराम रुग्णालयात दाखल आहेत तिथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी आई सोनीया यांच्या तब्येतीची चौकशी केली. सध्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनीया गांधी यांना कोरोनाच्या त्रासामुळे गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, जेवनानंतर राहुल गांधी पुन्हा ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. यामध्ये राहुल यांना आणखी कारी विचारपुस होणार आहे. त्यासाठी राहुल गांधी ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. दरम्यान, काँग्रेसने देशभर मोदी सरकारविरोधात आणि ईडीविरोधात आंदोलन पुकारले आहे. यामध्ये काँग्रेसने लोकशाही धोक्यात आहे. राजकीय वैमनश्यातून ही कारवाई कुरू आहे असा आरोपही काँग्रेसने केला आहे.

  • Former Union Minister and senior leader P Chidambaram suffered a fracture in his left rib after he was pushed away by Police today during the party's protest in Delhi: Congress party

    (File photo) pic.twitter.com/Ls2bR5JcOj

राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचले तेव्हा पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सोबत होत्या. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीतच राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचले होते. ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तिसऱ्या बॅरिकेडजवळ रोखलं. यानंतर राहुल आणि प्रियंका गांधी पुढे गेले असता नेते तिथेच बसून राहिले.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना तोंड देत असलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना विरोधकांचा पाठिंबा मिळाला नाही. राहुल यांची चौकशी सुरू असताना त्यांची बहीण आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी त्यांच्या आई सोनीया यांनी प्रकृती जाणून घेण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या.

राहुल गांधी यांच्या ईडी कारवाईवर दिल्लीत ठिकठिकाणी बॅनर लागले आहेत

नॅशनल हेराल्ड प्रकरण - नॅशनल हेराल्ड प्रकरण (2012)मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून आरोप केला की काही काँग्रेस नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड यंग इंडियन लिमिटेड (YIL) मार्फत विकत घेतले. दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेराल्ड हाऊसच्या (2000)कोटी रुपयांच्या इमारतीवर कब्जा करण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप स्वामी यांनी केला होता. कटाच्या अंतर्गत यंग इंडियन लिमिटेडला TJL च्या मालमत्तेचा अधिकार देण्यात आला आहे.

राहुल आणि सोनिया 2015 पासून जामिनावर - सर्वोच्च न्यायालयाने (2015)मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांना या प्रकरणी लवकर सुनावणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले होते. (19 डिसेंबर 2015)रोजी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ट्रायल कोर्टाने जामीन मंजूर केला होता. (2016)मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने खटला रद्द करण्यास नकार दिला आणि सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस आणि सुमन दुबे यांना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट दिली.

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला आणि शशी थरुर यांनी मोदी सरकारला भीती वाटत असल्याचं सांगत निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. आपल्या नेत्यांविरोधात करण्यात आलेले आरोप खोटे आणि तथ्यहीन असून हे सूडाचं राजकारण असल्याचा त्यांचा दावाही त्यांनी केला आहे.

मनी लॉडरिंगप्रकरणी राहुल गांधी यांना बजावण्यात आलेले समन्स पूर्णपणे निराधार आहे, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. राहुल गांधी लवकरच ईडीसमोर हजर होणार आहेत. ईडी भाजपच्या सदस्य किंवा ज्या राज्यांत भाजपची सत्ता आहे तिथे पोहोचत नाही, अशी टीकाही चिदंबरम यांनी केली आहे. आगामी राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षांमध्ये ऐक्य निर्माण व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले आहेत.

कुणाला अटक झाली - यामध्ये रणदीप सुरजेवाला, हरीश रावत, अधीर रंजन चौधरी, दीपेंद्र सिंग हुडा, अशोक गेहलोत, प्रमोद तिवारी आदींना अटक करण्यात आली. लखनौमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आराधना मिश्रा, मोना आणि नसीमुद्दीन यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. दिल्लीत अलका लांबा यांना पोलिसांनी घराबाहेर अडवले.

अशी काही छायाचित्रेही समोर आली होती, ज्यामध्ये पोलीस अनेक काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना खेचताना दिसत होते. त्यामुळे काहीजण जखमी झाले. ताब्यात घेतलेले केसी वेणुगोपाल यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांना ओढून नेण्यात आले आहे. तर, एका ठिकाणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनाही पोलिसांनी बाजूला लोटले तेव्हा त्यांनाही दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

Last Updated : Jun 13, 2022, 10:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.