नवी दिल्ली : काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातवरून पुन्हा एकदा केंद्रावर निशाणा साधला आहे. ट्विटरवर एक ट्विट करून राहुल यांनी केंद्राला लक्ष्य केले आहे. "देश कर रहा है मित्र-मनॉपली की बात!" असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
मन की बातचा धागा पकडून निशाणा
राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सातत्याने निशाणा साधत आहेत. रविवारी मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमाचा धागा पकडत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. "देश कर रहा है मित्र-मनॉपली की बात!" असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. केंद्र सरकारची नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन योजना ही मोदींच्या मित्रांच्या एकाधिकारशाहीसाठी असल्याची टीका राहुल गांधी यांनी केलेली आहे. त्यावरूनच मोदी मन की बात करत असताना देश मित्रांच्या एकाधिकारशाहीची बात करत असल्याचे राहुल यांना या ट्विटमधून सुचवायचे आहे असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
सोशल मीडियावरून सातत्याने टीका
राहुल गांधी सोशल मीडियावरून सातत्याने केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधत आहेत. नॅशनल मॉनेटायझेनश पाईपलाईनची घोषणा केल्यानंतर राहुल अधिक आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. या मुद्द्यावरूनच ते सातत्याने केंद्र सरकारला लक्ष्य करत आहेत. #IndiaOnSale हा हॅशटॅग वापरत राहुल गांधी या योजनेच्या मुद्द्यावरून केंद्रावर टीका करत आहेत.
हेही वाचा - भाजपचे 50 टक्क्यांनी उत्पन्न वाढले आणि तुमचे? राहुल गांधींचा टोला