ETV Bharat / bharat

पश्चिम बंगालमधील राजकीय रणधुमाळीतून कुठे गायब झाले राहुल-प्रियंका ? - पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा प्रचार

बंगाल निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा आणि टीएमसीने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. परंतु, काँग्रेसच्या प्रचाराचा वेग थंडावलेला दिसतो. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी ते प्रियंका गांधी वड्रापर्यंत पक्षाचे बडे नेते बंगाल निवडणूक प्रचारापासून दूर राहिल्याचे पाहायला मिळतयं. या खेळीमागे भाजपला रोखणं आणि ममता बॅनर्जींना फायदा पोहोचवणं हाच हेतू असल्याचं बोललं जात आहे.

राहुल-प्रियंका
राहुल-प्रियंका
author img

By

Published : Mar 27, 2021, 1:16 PM IST

नवी दिल्ली - पश्चिम बंगाल येथे पहिल्या टप्प्यात आज मतदान सुरू आहे. 25 मार्चपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, तृणमूल काँग्रेसचे नेते आणि भाजपाचे स्टार प्रचारक आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी प्रचारापासून दूर रहाल्याचे दिसून आले. तर आसाम, तमिळनाडू आणि केरळ या राज्यात दोन्ही नेत्यांनी जोरदार प्रचार केला. पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबत काँग्रेस निवडणूक लढवित आहे. बंगालपासून राहुल-प्रियंकाचे अंतर हे राजकीय विश्लेषकांनी निवडणुकीची रणनीती असल्याचे म्हटलं.

पश्चिम बंगालच्या रणधुमाळीतून गांधी कुटुंब दूर का?

भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेस अप्रत्यक्षपणे तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देत आहे. मात्र, उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते या गोष्टीचा नकार देतात. काँग्रेसचे प्रवक्ते जावेद अहमद यांच्या म्हणण्यानुसार राहुल-प्रियंका नक्कीच उर्वरित टप्प्यात प्रचार करतील. काँग्रेसचे लक्ष भाजपला पराभूत करण्याचे असल्याचेही ते म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्यासाठी जोरदार प्रचार केला. राजकीय वर्तुळात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात मुख्य स्पर्धेचा विचार केला जात आहे. परंतु काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी बंगालपासून अंतर कायम ठेवले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना पराभूत करणे शक्य नाही, त्यामुळे ते भाजपाला कमकुवत करण्याच्या रणनीतीवर काम करीत आहेत. जेणेकरून ममता बॅनर्जी यांचे सरकार परत येऊ शकेल. हेच कारण आहे की राहुल गांधींनी पश्चिम बंगालपासून अंतर ठेवल आहे. तर दुसरीकडे बंगालमध्ये बडे नेते उपस्थित असल्याचा दावा कॉंग्रेस प्रवक्त्यांनी केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका आहेत, तर आसाम, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरीमध्ये एक ते दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी या राज्यांना प्राधान्य दिले आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पश्चिम बंगालमध्येही जाणार आहेत. सध्या काँग्रेसचे मोठे नेते तिथे हजर आहेत. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला काँग्रेस नक्कीच पराभूत करेल. म्हणूनच ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही. आम्ही लढू आणि जिंकू, असे काँग्रेसचे प्रवक्ते जावेद अहमद म्हणाले.

पश्चिम बंगालसाठी काँग्रेसचा स्टार प्रचारक

पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस आणि यूपी प्रभारी प्रियंका गांधी, मलिकार्जुन खर्गे, अशोक गहलोत, अमरिंदर सिंह, भूपेश बघेल, अधीर रंजन चौधरी, बीके हरिप्रसाद, सलमान खुर्शीद, सचिन पायलट, रणदीपसिंग सुरजेवाला, जितिन प्रसाद, सुबोधकांत सहाय, मनीष तिवारी, आरपीएन सिंह, नवजोतसिंग सिद्धू, अझरुद्दीन, इम्रान प्रतापगढी, अब्दुल मन्नान, प्रदीप भट्टाचार्य, दीपदास ए.एच. खान चौधरी, अभिजीत मुखर्जी, दीपेंद्र हूडा, आचार्य प्रमोद कृष्णम, आलमगीर आलम, जयवीर शेरगिल आणि बीपी सिंग यांचा समावेश आहे.

हेही वाचा - LIVE Updates : प. बंगाल, आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.