डेहराडून - पुष्कर सिंह धामी यांनी आज उत्तराखंडचे १२ वे मुख्यमंत्री म्हणून ( Uttarakhand 12th CM Pushkar Singh Dhami ) शपथ घेतली. राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग (नि.) यांनी पुष्कर सिंग धामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ ( Pushkar Singh Dhami Takes Oath ) दिली. उत्तराखंडमध्ये सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची संधी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत धामी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. दुसरीकडे, पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत भाजपने दोन तृतीयांश बहुमत मिळवून सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. मात्र खुद्द सीएम धामी खतिमा जागेवरून निवडणूक हरले, असे असतानाही भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने धामी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. तसेच धामी यांना सहा महिन्यांत विधानसभेची निवडणूक जिंकावी लागणार आहे.
ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांचा जल्लोष - पुष्कर सिंह धामी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. डेहराडूनच्या परेड ग्राऊंडवर झालेल्या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार अनेकांनी पाहिले. ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्ते जल्लोष करताना दिसले. दुसरीकडे, पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत भाजपने दोन तृतीयांश बहुमत मिळवून सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. त्यानंतर पक्षाच्या हायकमांडनेही त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना येत्या ६ महिन्यांत विधानसभेचे सदस्य व्हावे लागणार आहे. कारण धामी यांना या विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
भाजयुमोमध्ये त्यांनी बजावलेली महत्त्वाची जबाबदारी: धामी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. भाजपच्या युवा कार्यकर्त्यांवर त्यांची चांगली पकड असल्याचे मानले जाते. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची भाजपची रणनीतीही असू शकते. ही रणनीती 2024 च्या लोकसभा निवडणुकीत रंग दाखवेल, असे सांगितले जात आहे. मात्र येणाऱ्या काळात भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सीएम पुष्कर सिंह धामी यांच्या पाठीमागे कश्याप्रकारे उभे राहतात हे पाहणे महत्त्वाचे मानले जात आहे. सध्यातरी त्यांची मतदार संघातून हार झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सुर असल्याचे दिसुन येत आहे. मात्र सीएम धामी हे त्यांची नाराजी दुर करण्यासाठी कश्याप्रकारे काम करतात हे पाहणे आगस्त्याचे ठरणारा आहे.
खातिमा येथून दोनदा आमदार, तिसर्यांदा पराभूत : धामी हे उधम सिंह नगर जिल्ह्यातील खतिमा विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार होते. मात्र यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. धामी हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांचे निकटवर्तीय मानले जातात. कोश्यारी हे आता सक्रिय राजकारणात नाहीत आणि सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. धामी हे राजनाथ सिंह यांचेही जवळचे मानले जातात.
धामी यांचा राजकीय प्रवास : पुष्कर सिंह धामी 2012 मध्ये खतिमा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या देवेंद्र चंद यांचा सुमारे ५ हजार मतांनी पराभव केला. 2017 च्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत धामी सलग दुसऱ्यांदा खातिमा येथून विजयी झाले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या भुवनचंद्र कापरी यांचा तीन हजारांपेक्षा कमी फरकाने पराभव केला. 2022 च्या निवडणुकीत त्यांचा काँग्रेसच्या भुवन कापरी यांनी सहा हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. उत्तराखंडमध्ये भाजपने बहुमत मिळवले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही पक्षाचे सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन होणार आहे.