ETV Bharat / bharat

Amritpal Singh Case : पंजाब पोलीस अमृतपाल सिंगच्या शोधात; 78 समर्थक अटकेत, इंटरनेट सेवा दोन दिवस बंद

कट्टरपंथी प्रचारक अमृतपाल सिंगसह त्याच्या सहा साथीदारांना अटक करण्यात आली अशी माहिती समोर आली होती. मात्र, आता पंजाब सरकारने याबाबतचा खुलासा केला आहे. अमृतपाल सिंगला अटक करण्यात आली नसल्याचे पंजाब सरकारने सांगितले आहे. सध्या पंजाबमध्ये अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

author img

By

Published : Mar 18, 2023, 3:58 PM IST

Updated : Mar 18, 2023, 10:30 PM IST

Amritpal Singh Arrests
Amritpal Singh Arrests
अमृतपाल सिंगने केली होती पोलिस स्थानकाची तोडफोड

चंदीगड(पंजाब) : खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगला पंजाब पोलिसांनी अटक केली असल्याची बातमी समोर आली होती. मात्र, पंजाब पोलीस अमृतपालच्या शोधात असल्याची माहिती पंजाब सरकारने दिली आहे. तसेच पोलिसांनी 'वारिस पंजाब दे'विरुद्ध राज्यभरात शोध मोहीम सुरू केली आहे. तसेच पंजाबमधील काही भागातील इंटरनेट सेवाही रविवारपर्यंत बंद राहणार आहे.

पोलीस बंदोबस्त वाढवला - पंजाबमध्ये अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. गिद्दरबहामध्ये एअरटेल, आयडिया, बीएसएनएलचे इंटरनेटही बंद आहे. संगरूर जिल्ह्यात इंटरनेट सेवाही बंद आहे. संगरूर हा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा जिल्हा आहे. अमृतसर-जालंधर महामार्गावरही पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी 'वारीस पंजाब दे' मुखी अमृतपालच्या साथीदारांना जालंधर जिल्ह्यातील मेहतपूर पोलिस ठाण्यात ताब्यात घेतले आहे.

आतापर्यंत 78 जणांना अटक - पंजाब पोलिसांनी 'वारिस पंजाब दे'विरुद्ध राज्यभरात व्यापक शोध मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत ७८ जणांना अटक करण्यात आली आहे, तर अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच अनेक हत्यारे, पिस्तुल, बंदूक जप्त करण्यात आले आहेत.

सहा साथीदार जालंधरमधून ताब्यात : कट्टरपंथी धर्मोपदेशक अमृतपाल सिंगच्या सहा साथीदारांना शनिवारी जालंधरमधून ताब्यात घेण्यात आले. सिंग यांच्या समर्थकांनी ही माहिती दिली. वारिस पंजाब दे प्रमुख सिंग याच्या काही समर्थकांनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर करत दावा केला की, पोलीस त्यांचा पाठलाग करत होते. एका व्हिडिओमध्ये अमृतपाल एका वाहनात बसलेलेही दिसत आहे. दरम्यान, अमृतपाल सिंगला अद्याप अटक केली नाही.

पोलिसांसोबत झाली होती चकमक - गेल्या महिन्यात अमृतपाल व त्याचे समर्थक तलवारी, पिस्तूल घेऊन अमृतसर शहराच्या बाहेरील अजनाळा पोलिस स्टेशनमध्ये घुसले होते. यादरम्यान अमृतपालच्या जवळच्या मित्राला सोडवण्यासाठी त्यांची पोलिसांशी चकमक झाली होती.

अमृतपाल सिंग घटनास्थळावरून फरार : बर्नाळा जिल्ह्यात मोबाईल, इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण पंजाबमध्ये रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंगचा पाठलाग केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र अमृतपाल सिंग घटनास्थळावरून फरार झाला आहे. पंजाबच्या मोगा जिल्ह्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला आहे. पंजाब पोलिसांनी लोकांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांच्या कामात ढवळाढवळ करु नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

सिंगच्या जवळच्या साथीदाराला अटक : या महिन्याच्या सुरुवातीला अमृतपाल सिंगच्या जवळच्या साथीदाराला अमृतसर विमानतळावर देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली होती. गुरिंदरपाल सिंग औजला यांना श्री गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. ज्याने वादग्रस्त कट्टरतावादी उपदेशकासाठी सोशल मीडियाचा वापर असल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, औजला इंग्लंडला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. तो लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काय होते प्रकरण : पंजाबच्या अमृतसरमधील अजनाळा येथे 23ल फेब्रुवारी रोजी हिंसक निदर्शने झाली होती. 'वारिस पंजाब दा'चे अध्यक्ष अमृतपाल सिंग याच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन केले होते. जमावाने बॅरिकेड्सही तोडले होते. अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध एफआयआर नोंदवल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी अमृतपालचे अनुयायी मोठ्या संख्येने अजनाळा येथील पोलीस ठाण्यासमोर जमू लागले होते. पोलिसांशी वाद झाल्यानंतर समर्थक हिंसक झाले होते.

एफआयआर रद्द करण्याची मागणी : अमृतपाल त्याचे साथीदार अजनाळा पोलिस ठाण्यात पोहोचू नयेत, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. बॅरिकेड्सही लावले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाच जिल्ह्यांतील पोलिसांचा फौजफाटा अजनाळ्यात तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा - Kisan Long March : ‘लाल वादळा’च्या 70 टक्के मागण्यांची अंमलबजावणी सुरू, लॉग मार्च माघारी परतण्यास सुरुवात

Last Updated : Mar 18, 2023, 10:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.