चंदीगड (पंजाब) - पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाब मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी प्रस्तावित नावांच्या यादीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून मंजुरी मिळाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तसेच आज दुपारी या नावांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
यांचा समावेश असण्याची शक्यता -
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रह्म मोहिंद्रा, राणा गुरजीत सिंग, मनप्रीत सिंग बादल, त्रिपाट राजिंदर सिंह बाजवा, सुखबिंदर सिंग सरकारिया, अरुणा चौधरी, रझिया सुल्ताना, डॉ. राज कुमार वेरका, भारत भूषण आशु, विजय इंदर सिंगला, गुरकीरत सिंग कोटली, राजा वरींग आणि संगत सिंग गिलजियन यांचाही समावेश होऊ शकतो. दुसरीकडे, काका रणदीप सिंह, परगट सिंग आणि कुलजित सिंग नागरा यांची नावे अंतिम झाली असल्याची माहिती आहे. नवीन यादीनुसार काँग्रेस हायकमांडने पंजाब काँग्रेसमधील दोन्ही गटांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.