चंदीगड : पंजाबमधील कोटकपुरा मार्गावरील श्री मुक्तसार साहिब आणि वारिंग गावाजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कालव्यात कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस श्री मुक्तसर साहिब येथून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निघाली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मुसळधार पाऊस आणि चालकाचं वेगावरील नियंत्रण सुटल्यानं झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिकांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.
पंजाबमध्ये रोज भीषण अपघात होत आहेत. श्री मुक्तसार साहिब आणि कोटकपुरा मार्गावरील वारिंग गावाजवळ कालव्यात बस कोसळल्यानं भीषण अपघात झाला. ही बस दुपारी १ वाजता श्री मुक्तसर साहिबहून निघाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
जखमी प्रवाशी रुग्णालयात दाखल-भरधावानं वेगानं जाणाऱ्या बसनं वेगानं पुलाच्या लोखंडी अँगलला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, कालव्याच्या पुलाच्या लोखंडी अँगलला धडक दिल्यानंतर बसचा अर्धा भाग कालव्यात कोसळला. तर अर्धी बस पुलाच्या बाहेर लटकून राहिली. या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने स्थानिक लोक अपघातस्थळी पोहोचले. काही जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. घटनास्थळी अपघाताचं दृश्य हे अत्यंत भयावह होते.
1992 मध्येही असाच अपघात झाला होता: अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर आणि कंडक्टर घटनास्थळावरून पळून गेले. याआधी पंजाब रोडवेज श्री मुक्तसर साहिबची बस 1992 मध्ये याच कालव्यात पडल्यानं लहान मुलांसह सुमारे 80 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या रस्त्यावर टोलनाका असताना अद्याप पूल बांधलेला नाही, अशी स्थानिकांची तक्रार आहे.
मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त- अपघाताबाबत मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून शोक दु:ख व्यक्त केले. घटनास्थळी प्रशासनाचे पथक घटनास्थळी मदत कार्यात गुंतल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. अपघाताची माहिती मिळताच पंजाबचे मंत्री गुरमीत सिंग खुडियान आणि आमदार काका ब्रार हेही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रवाशांवर योग्य उपचार करण्याच्या प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
हेही वाचा-