ETV Bharat / bharat

ATS Arrests Armaan: पुण्यात एटीएसने दोन संशयितांना घेतले ताब्यात, तर यूपी एटीएसने अरमानला केली मुंबईत अटक - ATS Arrests Armaan

आयएसआय एजंट रईसची पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या बॉसशी ओळख करून देणाऱ्या, अरमानला यूपी एटीएसने मुंबईतून अटक केली आहे. एटीएसने रईसचा साथीदार गोंडा येथील रहिवासी असलेल्या सलमानलाही अटक केली आहे. दोघेही मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथे राहत होते. तर पुण्यात एटीएसने दोघांना ताब्यात घेतले आहे.

ATS Arrests Armaan
अरमानला एटीएसने अटक केली
author img

By

Published : Jul 18, 2023, 11:05 PM IST

पुणे/लखनऊ :- पुण्यातील कोथरूड येथून पुणे पोलीस व एटीएस कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.देशविरोधी कृत्याच्या संशयावरून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर एक आरोपी यात फरार झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पुणे पोलीस व एटीएसला माहिती मिळाली त्या माहितीच्या नुसार त्यांनी कोथरूड परिसरातून त्या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी फरार आहे. दोन्ही तरुणांच्या लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद माहिती आढळली आहे. देशविरोधी कारवाई केल्याच्या संशयावरून त्या दोन्ही तरुणांना ताब्यात घेण्यात आल असून आज दिवसभर पुणे पोलिसांकडून दोन्ही तरुणांची चौकशी देखील करण्यात आली आहे.

दुसरीकडे उत्तर प्रदेशात आयएसआय एजंट रईसची पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या बॉसशी ओळख करून देणाऱ्या अरमानला यूपी एटीएसने अटक केली आहे. एटीएसने अरमानला मुंबईतून अटक केली आहे. याशिवाय रईसचा साथीदार गोंडा येथील रहिवासी असलेल्या सलमानलाही अटक करण्यात आली आहे. दोघेही मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथे राहत होते. एटीएस आणखी काही संशयितांचा शोध घेत आहे. त्याच्या दोन मदतनीसांनाही लवकरच अटक करण्यात येणार आहे.

एटीएसने गोंडाच्या रईसला अटक केली होती : यूपी एटीएस प्रमुख नवीन अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडातील तारबगंज येथील रईस याला १६ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्याने आयएसआयच्या हँडलरला गोपनीय माहिती पाठवल्याची वस्तुस्थिती मान्य केली होती. एवढेच नाही तर चौकशीदरम्यान त्याने आपल्या काही सहकाऱ्यांची नावेही उच्चारली होती. चौकशीदरम्यान त्याने गोंडा येथील रहिवासी असलेल्या सलमानच्या मदतीने झाशी रेल्वे स्टेशन आणि बबिना मिलिटरी कॅन्टोन्मेंटचे फोटो आणि व्हिडिओ मिळवल्याचे सांगितले होते.

अरमानने रईसला आयएसआय हँडलच्या संपर्कात आणले होते: एटीएसच्या चौकशीत रईसने सांगितले होते की, तो काही वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात गोंडाहून मुंबईला गेला होता. जिथे त्याची भेट जोगेश्वरी पूर्व येथील रहिवासी असलेल्या अरमानशी झाली. अरमाननेच रईसला मुस्लिम समाजावरील अत्याचार आणि बाबरी मशीद विध्वंसाचा बदला घेण्यासाठी चिथावणी दिली आणि त्याला आयएसआयच्या हँडलरच्या संपर्कात आणले. एटीएस प्रमुखांच्या म्हणण्यानुसार, रईसच्या संपर्कात असलेल्या इतर काही संशयितांचाही शोध घेण्यात येत आहे.

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात : याआधीही असाच एक प्रकार घडले होता. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर हा ई-मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले होते. त्याचप्रमाणे प्रदीप कुरुलकर ज्या महिलांच्या संपर्कात होता, त्या पाकिस्तानी महिलांच्या अश्लील फोटोंच्या बदल्यात प्रदीप कुरुलकर याने ब्राह्मोस आणि अग्नी या क्षेपणास्त्राची अति महत्त्वाची माहिती पुरवल्याचे दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात निष्पन्न झाले होते.

हेही वाचा -

  1. Pradeep Kurulkar News : अश्लील फोटोसाठी डीआरडीओ संचालक प्रदीप कुरुलकरकडून विश्वासघात, पाकिस्तानला 'ही' दिली माहिती
  2. Mumbai Terror Threat Call : मुंबईत तीन दहशतवादी दाखल झाल्याची खोटी माहिती देणाऱ्याला अहमदनगरमधून अटक
  3. 'सिमी'च्या दोन दहशतवाद्यांना 'एटीएस'ने केली अटक, 2006 पासून होते फरार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.