ETV Bharat / bharat

पालकांनो सावधानं!  ऑनलाईन गेममधून मुलांमध्ये वाढतेय गुन्हेगारी - ब्लू व्हेल

PUBG and Blue Whale Online Game : आजकाल प्रत्येक मुलाच्या हातात स्मार्टफोन सामान्य झालाय. पण त्याचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होतोय. मुलं फोनवरून खेळत असलेले गेम कधी कधी त्यांच्या जीवालाही घातक ठरु शकतात. हे ऑनलाइन गेम किती धोकादायक ठरू शकतात, यावर तज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केलंय.

PUBG and Blue Whale
PUBG and Blue Whale
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 11:20 AM IST

Updated : Jan 7, 2024, 11:53 AM IST

ऑनलाईन गेमचे तोटे

रायपूर PUBG and Blue Whale Online Game : स्मार्टफोनमुळं आपलं आयुष्य सुकर झालंय. पण लहान मुलंही यापासून लांब नाहीत. आजकाल लहान वयातच मुलांच्या हातात स्मार्टफोन पोहोचला आहे. त्याद्वारे ते अनेक प्रकारचे ऑनलाइन गेम्स खेळतात. या खेळांच्या सवयीमुळं मुलांच्या मानसिक स्तरावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालाय. फोनमुळं मुलांची बाहेर जाऊन खेळण्याची क्षमता कमी झालीय. परिणामी मुलं आळशी होत आहेत.

मुलांमध्ये वाढती आक्रमकता : मुलांचं मनोरंजन करण्यासोबतच ऑनलाइन गेममुळं त्यांच्यात आक्रमकता आणि राग वाढतोय. खुद्द मानसोपचारतज्ज्ञ आणि सायबर तज्ज्ञांनीही हे मान्य केलंय. पब्जी, ब्ल्यू व्हेलसारखे आक्रमक खेळ खेळून त्यांच्यात आक्रमकता वाढत आहे. त्यामुळं ते गुन्हे करत आहेत. पब्जी आणि ब्लू व्हेल सारख्या खेळांमुळं मुलांमध्ये गुन्हेगारीवृत्ती निर्माण होत आहेत. त्यामुळंच अशी खेळांवर जागतिक स्तरावर बंदी घालण्यात आलीय. पण आजही पब्जी आणि ब्लू व्हेलसारखे अनेक गेम लहान मुलांना इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत.

खेळांमध्ये व्यसनाधीन क्षमता असते : डॉ. भीमराव आंबेडकर रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुरभी दुबे यांनी याविषयी सांगितलं की, "इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या गेममध्ये व्यसन निर्माण करण्याची क्षमता असते. ते खेळताना तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं रसायन उत्सर्जित होतं. आपल्याला हलकं वाटतं. कोणत्याही व्यसनाचा अतिरेक केल्यानं आपण आक्रमक होऊ लागतो. अशा खेळांमधील हिंसा पाहून आपल्यातही अशीच वर्तणूक विकसित होऊ लागते."

ऑनलाइन गेममध्ये शस्त्रांचा वापर : सायबर एक्सपर्ट मोनाली गुहा यांनी म्हटलंय की, "असं काही गेम आहेत, ज्यात शस्त्रांचा वापर केला जातो. असे गेम खेळणं मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. या गेम्समध्ये मुलांना शस्त्रे वापरण्याची संधी दिली जाते. त्यांचा वापर करणं शिकवले जातं. गोळ्यांचा वापर कसा करायचा, गोळ्या कोणत्या अंतरावर सोडायच्या अशा गोष्टी मुलांना शिकवल्या जातात. हे प्रशिक्षण सैन्यदलातील जवानांसाठी उपयुक्त आहे. जर एखाद्या सामान्य नागरिकाला किंवा मुलाला या गोष्टी माहीत असतील, मग त्याच्या हातात शस्त्रे आल्यावर तो नक्कीच वापरेल."

ऑनलाइन गेममुळं मुलं होत आहेत गुन्हेगार : पब्जी गेम सुरू झाल्यानंतर त्याची क्रेझ इतकी वाढली की, लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सगळेच हा गेम खेळण्यात व्यस्त होऊ लागले. यानंतर पब्जी खेळणाऱ्या मुलांनीही अनेक गुन्हे केले. 2019 मध्ये कर्नाटकमध्ये 21 वर्षीय तरुणानं आपल्याच वडिलांची हत्या केली होती. कारण वडिलांनी आपल्या मुलाला गेम खेळण्यास मनाई केली होती. जुलै 2021 मध्ये बंगालमध्ये पब्जी गेमवरुन झालेल्या वादातून एका तरुणानं आपल्या भावाची हत्या केली होती. जानेवारी 2022 मध्ये वॉशिंग्टनमध्ये एका मुलानं आईसह तीन भावंडांची हत्या केली. अशी अनेक प्रकरणे पाहिल्यानंतर असे आक्रमक खेळ जागतिक स्तरावर बंद करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

  1. धक्कादायक! मोबाईलवर सतत गेम खेळत असल्यानं रागावले वडील; मुलानं संपवलं जीवन
  2. Online game side effect : सावधान! तुमच्या मुलांवर ऑनलाइन गेमच्या व्यसनाचा होईल 'हा' भयंकर परिणाम

Last Updated : Jan 7, 2024, 11:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.