नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी ( ROPHET REMARKS ROW ) भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला ( SC on Nupur Sharma case ) आहे. नुपूर शर्माच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने तिच्या अटकेला १० ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली ( SC protects Nupur Sharma from coercive action ) आहे.
केंद्र सरकारला नोटीस : यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. नुपूर शर्माच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. नुपूर शर्मा यांच्यावर कोणतीही जबरदस्ती करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
नुपूर शर्मा यांचे वकील मनिंदर सिंग यांनी सांगितले की, नुपूर शर्माच्या जीवाला गंभीर धोका आहे. हा आदेश देताना खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या हत्येचे व्हायरल झालेले वक्तव्य सलमान चिश्ती यांचीही दखल घेतली. उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने याचिकाकर्त्याचा शिरच्छेद करण्याची धमकीही दिल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त टिप्पणी प्रकरणात विविध राज्यांमध्ये नोंदवलेल्या एफआयआर एकत्र करून अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.