Pune Woman On JNU VC : पुण्यातील महिला प्राध्यापकाची JNU च्या कुलगुरूपदी नियुक्ती - पुण्यातील प्राध्यापकाची जेएनयूच्या कुलगुरूपदी नियुक्त
पुण्यातील महिला प्राध्यपक प्रा.संतीश्री धुलीपुडी पंडित यांनी महाराष्ट्राची मान उंचावली. त्यांची जवाहरलाल नेहरू विद्यापीठच्या ( Vice-Chancellor of Jawaharlal Nehru University ) कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी असणार आहे.
नवी दिल्ली - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) महिला प्राध्यपक प्रा.संतीश्री धुलीपुडी पंडित यांची जवाहरलाल नेहरू विद्यापीठच्या ( Vice-Chancellor of Jawaharlal Nehru University ) कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी असणार आहे.
प्रा.संतीश्री धुलीपुडी पंडित या पूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक होत्या. तर जेएनयूचे प्राध्यापक एम. जगदेश कुमार आज विद्यापीठ अनुदान आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्यातील पुणे मधील एक विद्यापीठ आहे. मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना 10 फेब्रुवारी 1949 रोजी झाली. या संस्थेचे मुख्य आवार 411 एकर क्षेत्रांत पसरलेले आहे. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. भारताच्या काही प्रसिद्ध विद्यापीठातील हे एक विद्यापीठ आहे.
जेएनयूविषयी....
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) हे एक नवी दिल्लीमधील विद्यापीठ आहे. त्याची स्थापना 1969 मध्ये झाली. विद्यापीठाची स्थापना संसदेच्या अधिनियमाने केली. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर विद्यापीठाचे नाव ठेवले गेले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे भारतातील आघाडीचे विद्यापीठ आहे.
हेही वाचा - Lata Mangeshkar : लता मंगेशकरांच्या आस्थिचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी