ETV Bharat / bharat

बदायूं बलात्कार प्रकरण : चंद्रमुखी देवींच्या वक्तव्यावर प्रियांका गांधी भडकल्या

महिला आयोगाच्या सदस्यांनीच अशा प्रकारची वक्तव्ये केली, तर देशातील महिला कशा सुरक्षित समजाव्यात? आयोगाच्या सदस्या या झालेल्या प्रकारासाठी पीडितेलाच दोष देत आहेत. तसेच, या प्रकरणातील पिडितेचा शवविच्छेदन अहवाल लीक झाल्यामुळे प्रशासन नाराज आहे. सध्या पीडिता रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. देशातील महिला अशा प्रकारची वक्तव्ये कधीच माफ करणार नाहीत, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

author img

By

Published : Jan 8, 2021, 3:59 PM IST

Priyanka slams NCW member for remarks on Badaun case
बदायूं बलात्कार प्रकरण : चंद्रमुखी देवींच्या वक्तव्यावर प्रियांका गांधी भडकल्या

नवी दिल्ली : राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांना काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी चांगलेच फटकारले आहे. उत्तर प्रदेशच्या बदायूंमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी चंद्रमुखी यांनी जे वक्तव्य केले, त्याबाबत गांधी यांनी देवींवर टीका केली आहे. संबंधित महिलेवर मंदिरात सामूहिक बलात्कार करुन तिला जबर मारहाण करण्यात आली होती. त्यावर; ती महिला एकटी मंदिरात गेली नसती, तर असे काही झालेच नसते असे बेजबाबदार वक्तव्य देवी यांनी केले होते.

देशातील महिला कशा सुरक्षित समजाव्या?

महिला आयोगाच्या सदस्यांनीच अशा प्रकारची वक्तव्ये केली, तर देशातील महिला कशा सुरक्षित समजाव्यात? आयोगाच्या सदस्या या झालेल्या प्रकारासाठी पीडितेलाच दोष देत आहेत. तसेच, या प्रकरणातील पिडितेचा शवविच्छेदन अहवाल लीक झाल्यामुळे प्रशासन नाराज आहे. सध्या पीडिता रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. देशातील महिला अशा प्रकारची वक्तव्ये कधीच माफ करणार नाहीत, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

काय म्हणाल्या होत्या देवी?

या घटनेनंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी पीडितेच्या गावाला भेट दिली होती. यावेळी त्या म्हणाल्या, की "सायंकाळच्या वेळी ती महिला मंदिरात गेली नसती, किंवा एखादे लहान मूल वगैरे असे कोणी तिच्या सोबत असते तर अशी घटना घडली नसती. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असली, तरी मी हेही म्हणेल की महिलांनी चुकीच्या वेळी घराबाहेर पडू नये."

काय आहे प्रकरण?

रविवारी सायंकाळी एक ५० वर्षीय महिला मंदिरात गेली असता, मंदिरातील पुजारी आणि त्याच्या साथीदारांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर तिला जबर मारहाण करुन, तिच्या घराबाहेर फेकण्यात आले होते. त्यानंतर उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू आहे.

हेही वाचा : निशस्त्र वन कर्मचारी तस्करांपासून जंगलाचे आणि स्वत:चे रक्षण कसे करणार?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.