मेरठ - 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा नवा उमेदवार कोण असणार हे पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा ठरवतील, असे विधान माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केले आहे.
निवडणूक जाहीरनाम्याच्या संदर्भात शनिवारी मेरठमध्ये आल्यानंतर खुर्शीद म्हणाले की, काँग्रेस उत्तर प्रदेशातील निवडणुका पूर्ण ताकदीने लढेल आणि जिंकेल. प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली सद्य सरकारच्या धोरणांविरोधात पक्ष आवाज उठवेल. काँग्रेसच्या पुढील राष्ट्रीय अध्यक्षांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खुर्शीद म्हणाले, कोणाच्या नेतृत्वाखाली पक्ष पुढे चालला आहे हे सर्वांना माहित आहे. उत्तर प्रदेशामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाचा नवा चेहरा निवडण्याबाबत ते म्हणाले की, हा निर्णय प्रियंका गांधी घेईल. पुढे बोलताना ते म्हणाले की, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तेथे निर्माण झालेली अराजकता भाष्य करताना खुर्शीद म्हणाले, की भारतात राहणाऱ्या अफगाण विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे. अफगाणिस्तानच्या धोरणाबाबत त्यांनी यावेळी केंद्र सरकारवर निशाणा साधत, अफगाणिस्तान आणि तालिबानच्या बाबतीत सरकारने आपले धोरण स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले.
'महिला अत्याचारात उत्तर प्रदेश अग्रस्थानी'
यावेळी उपस्थित पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता सुप्रिया श्रीनेते यांनी सांगितले, की कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात महिलांचा आदर नाही. शेतकरी आणि तरुण चिंतेत आहेत. आतापर्यंत 10 टक्के लोकांनाही लस दिलेली नाही. कुपोषण आणि महिलांवरील गुन्हेगारीच्या बाबतीत उत्तर प्रदेश अव्वल आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. शेतकऱ्यांवर अत्याचार होत आहेत. बेरोजगारी वाढली आहे. आता या सरकारचा निरोप घेण्याची वेळी आली आहे, असेही त्या म्हणाल्या. पक्षाचे नेते सध्या काँग्रेसचा जाहीरनामा तयार करण्यासाठी राज्याच्या विविध भागांचा दौरा करत आहेत. या संदर्भात, खुर्शीद, श्रीनेते, माजी आमदार विवेक बन्सल, अमिताभ दुबे आणि काँग्रेस कमिटीचे सचिव रोहित चौधरी यांच्यासह काँग्रेस निवडणूक जाहीरनामा समितीची टीम शनिवारी मेरठला आली होती.
हेही वाचा - अफगाणिस्तानबाबत काय होती पंडीत नेहरुंची भूमिका, वाचा...