ETV Bharat / bharat

FIR On Priyanka Gandhi : मध्य प्रदेश सरकारवर कमीशनखोरीचा आरोप भोवला, प्रियंका गांधींसह कमलनाथांवर गुन्हा दाखल

author img

By

Published : Aug 13, 2023, 8:37 AM IST

मध्य प्रदेश सरकारवर ट्विटद्वारे केलेल्या या आरोपामुळे प्रियंका गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह काँग्रेस नेते कमलनाथ, माजी मंत्री अरुण यादव यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR On Priyanka Gandhi
प्रियंका गांधी

भोपाळ : मध्य प्रदेश सरकारवर 50 टक्के कमीशनखोरीचा आरोप ट्विटरवर करने प्रियंका गांधी यांना चांगलेच भोवले आहे. मध्य प्रदेश सरकारवर ट्विटद्वारे केलेल्या या आरोपामुळे प्रियंका गांधी यांच्यासह मध्य प्रदेशचे काँग्रेस नेते कमलनाथ, माजी मंत्री अरुण यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या निमेश पाठक यांनी प्रियंका गांधी यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर संयोगितागंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त रामस्नेही मिश्रा यांनी दिली आहे.

खोटे पत्र केले होते व्हायरल : प्रियंका गांधी यांनी कथित पत्र व्हायरल करुन भाजपा सरकारवर हल्लाबोल केला होता. या पत्रात मध्य प्रदेश सरकार प्रत्येक सरकारी कामात 50 टक्के कमीशन घेत असल्याचा आरोप केला होता. ज्ञानेंद्र अवस्थी यांनी हे पत्र सोशल माध्यमांवर व्हायरल केल्याचे बोलले जात होते. मात्र हे खोटे पत्र असल्याचे शिवराज सिंह चव्हाण यांनी उघडकीस आणले होते. त्यानंतर भाजपाच्या वतीने काँग्रेस नेत्यांवर मध्य प्रदेश सरकारची प्रतिमा मलिन करण्याची आणि खोटी माहिती पसरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे प्रियंका गांधी, कमलनाथ, अरुण यादव यांच्याविरोधात संयोगितागंज पोलीस ठाण्यात भादंवी कलम 420 आणि 469 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त रामस्नेही मिश्रा यांनी दिली.

मध्य प्रदेशातील 50 टक्के कमीशन घेणारे सरकार हटवणार : कर्नाटकमधून जनतेने 40 टक्के कमीशनखोरांना हटवले, आता मध्य प्रदेशातील 50 टक्के कमीशन घेणाऱ्या कमीशनखोरांना हटवणार असल्याचा दावा प्रियंका गांधी यांनी केला होता. याबाबत प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलरवर ट्विट करत सरकारवर गंभीर आरोप केले होते. कंत्राटदारांनी न्यायाधीशांना पत्र लिहत 50 टक्के कमीशन दिल्याशिवाय आमचे बील निघत नसल्याचा आरोप या कथित पत्रात करण्यात आला होता. हाच धागा पकडून प्रियंका गांधी यांनी मध्य प्रदेश सरकारवर गंभीर आरोप केले होते.

कमलनाथ आणि अरुण यादव यांनीही केले होते आरोप : मध्य प्रदेश सरकारवर काँग्रेस नेते कमलनाथ आणि अरुण यादव यांनीही कमीशनखोरीचे आरोप केले होते. या दोघांनीही आपल्या ट्विटरवर हेच पत्र ट्विट करत भाजपा सरकारवर गंभीर आरोप केले होते. कर्नाटकच्या जनतेने 40 टक्के कमीशन घेणाऱ्या भाजपा सरकारला हाकलून लावले, तसेच आता मध्य प्रदेशातील जनता 50 टक्के कमीशन घेणाऱ्यांना हाकलणार असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला. त्यावर भाजपाने जोरदार आक्षेप घेत हे पत्रच बनावट असल्याचे उघडकीस आणले. त्यामुळे काँग्रेसचे नेते कमलनाथ आणि अरुण यादव यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. Karnataka Assembly Elections: कर्नाटकने दाखवून दिले लक्ष विचलित करणारे राजकारण चालणार नाही -प्रियंका गांधी
  2. Congress Strategy : कर्नाटकातील विजयानंतर कॉंग्रेसची नजर आता अन्य राज्यांवर, वाचा स्पेशल रिपोर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.