नवादा - लाखो विद्यार्थ्यांनी घर, शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेऊन आपले करियर घडवले. मात्र, बिहारमधील एका तरुणाने तुरुंगात राहून आपले भविष्य बनवले आहे. तुरुंगात असलेल्या कैद्याकडून अशी अपेक्षा क्वचितच कोणी करू शकेल. पण बिहारच्या नवादा तुरुंगात बंद असलेल्या कौशलेंद्र कुमार या कैद्याने ( Prisoner Passed IIT Exam ) आयआयटी परीक्षा ( IIT- JAM) पास करून सर्वांना आश्चर्यचकित केले. या परीक्षेत कौशलेंद्रने 54 वा रँक मिळवला आहे.
हत्येच्या आरोपाखाली आहे तुरुंगात कैद - कौशलेंद्र कुमार उर्फ सूरज कुमार हा जिल्ह्यातील वारिसलीगंज पोलीस स्टेशन (Warisliganj Police Station) क्षेत्रातील मोस्मा गावचा रहिवासी आहे. 19 एप्रिल 2021 रोजी मौसुमा गावात झालेल्या एका हल्ल्याच्या आरोपाखाली त्याला तुरुंगात ठेवण्यात आले आहे. या मारामारीत संजय यादव या ४५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शास्त्रज्ञ होण्याचे सूरजचे स्वप्न आहे. त्यामुळेच तुरुंगात आल्यानंतरही त्यांनी अभ्यास न सोडता केवळ तयारी करून ही परीक्षा पास केली आहे.
तुरुंगातच केला अभ्यास - कौशलेंद्र कुमार जवळपास 11 महिन्यांपासून तुरुंगात आहे आणि तुरुंगातूनच स्वत: अभ्यास करून आयआयटीची पात्रता परीक्षा पास (IIT Preparation In Jail) केली आहे. आयआयटी रुडकीने जाहीर केलेल्या निकालात त्याला 54 वा क्रमांक मिळाला आहे. आयआयटीद्वारे दरवर्षी पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी परीक्षा आयोजित केली जाते. ज्याद्वारे 2 वर्षांच्या एमएससी प्रोग्राम कोर्समध्ये प्रवेश दिला जातो. सुरजला पुढील वाटचालीकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय माजी कारागृह अधीक्षक अभिषेक कुमार पांडे आणि त्याचा भाऊ वीरेंद्र कुमार यांना दिले आहे.