ETV Bharat / bharat

PM Modi Mother Birthday : आईचे पाय धुवून पंतप्रधान मोदींनी घेतले आशीर्वाद.. वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा - पंतप्रधान नरेंद्र मोदी आई वाढदिवस

पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर असताना आज त्यांची आई हिराबा यांचाही वाढदिवस ( PM Narendra Modi Mother Birthday ) आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले ( PM Reached Mother Home In Gandhinagar ) आहेत. पंतप्रधान मोदींच्या आई हिराबा आज 100 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यामुळे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांची भेट घेऊन आईचे पाय धुवून आशीर्वाद घेतले.

PM Modi reached his mother Hiraba's house to celebrate her 100th birthday
आईचे पाय धुवून पंतप्रधान मोदींनी घेतले आशीर्वाद
author img

By

Published : Jun 18, 2022, 8:09 AM IST

Updated : Jun 18, 2022, 11:22 AM IST

गांधीनगर ( गुजरात ) : पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर असताना आज त्यांची आई हिराबा यांचाही वाढदिवस आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींच्या आई हिराबा आज 100 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यामुळे यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. पंतप्रधान मोदींच्या हातात एक पिशवीही होती, त्यांच्या हातातील पिशवीत त्यांनी आईसाठी भेटवस्तू आणल्याचे दिसत आहे.

आईचे पाय धुवून पंतप्रधान मोदींनी घेतले आशीर्वाद.. वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

अहमदाबाद विमानतळावर जोरदार स्वागत : पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी अहमदाबाद विमानतळावर (Pm modi ahmedabad airport) त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी विमानतळावरून ते थेट राजभवनाकडे रवाना झाले. जिथे त्यांनी रात्री मुक्काम केला. दुसरीकडे, पंतप्रधान मोदी आज त्यांच्या वेळापत्रकानुसार वडोदरा आणि इतर ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. अहमदाबाद विमानतळावर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी पंतप्रधानांचे जंगी स्वागत केले. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील, राज्याचे प्रोटोकॉल मंत्री जगदीशभाई विश्वकर्मा, महापौर किरीटभाई परमार, मुख्य सचिव पंकज कुमार, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव के कैलासनाथन, राज्याचे पोलीस प्रमुख आशिष भाटिया, जिल्हाधिकारी संदीप सांगळे आणि शहर पोलीस आयुक्त संजय श्रीवास्तव उपस्थित होते.

  • Gujarat | Prime Minister Narendra Modi met his mother Heeraben Modi at her residence in Gandhinagar on her birthday today.

    Heeraben Modi is entering the 100th year of her life today. pic.twitter.com/CEVF9aAocv

    — ANI (@ANI) June 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाय धुवून आईचे आशीर्वाद : घरी पोहोचल्यानंतर मोदींनी आईची भेट घेतली. तसेच आईचे पाय धुवून त्यांनी आशीर्वाद घेतला. आशीर्वाद घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची आई हीराबेन मोदी यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानावरून पुढील कार्यक्रमासाठी निघाले.

हेही वाचा : PM Modi Mother Birthday : पंतप्रधानांच्या आई 18 जूनला होतील 100 वर्षांच्या.. आशीर्वाद घेण्यासाठी गुजरातला जाणार मोदी

Last Updated : Jun 18, 2022, 11:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.