नवी दिल्ली Vande Bharat Train : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 11 राज्यांमध्ये धावणाऱ्या 9 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या वंदे भारत गाड्यांमुळे अकरा राज्यांमधील प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे. या सर्व वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत गाड्या आधीच देशभरात अनेक मार्गांवर धावत असून आणखी नऊ रेल्वे जोडल्या जाणार आहेत.
राज्यांमधील संपर्क वाढणार : या नऊ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या 11 राज्यांमध्ये धावणार आहेत. या राज्यांमध्ये राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड गुजरातचा समावेश आहे. वंदे भारत ट्रेनमुळं या राज्यांमधील संपर्क दळणवळ वाढण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केलं. या कार्यक्रमाला 11 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, इतर उच्च अधिकारी उपस्थित होते. त्यात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णवही उपस्थित होते.
9 वंदे भारत गाड्या सुरू : या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याची ही अभूतपूर्व संधी आहे. पायाभूत सुविधांचा वेग देशातील 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांशी जुळणारा आहे. आज भारताला याचीच गरज आहे. पंतप्रधान म्हणाले की, आज एकाच वेळी 9 वंदे भारत गाड्या सुरू केल्या जातील. हे एक उदाहरण आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड, गुजरातसह 11 राज्यांतील लोकांनी आज वंदे भारत सुविधेचा लाभ घेतला आहे.
रेल्वे गाड्यांची नावं :
- उदयपूर- जयपूर वंदे भारत एक्सप्रेस
- तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस
- हैदराबाद-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस
- विजयवाडा-चेन्नई (रेनिगुंटा मार्गे) वंदे भारत एक्सप्रेस
- पाटणा-हावडा वंदे भारत एक्सप्रेस
- कासारगोड-तिरुवनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस
- राउरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्सप्रेस
- रांची-हावडा वंदे भारत एक्सप्रेस
- जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस
हेही वाचा -
- PM Modi Flagged Off Vande Bharat : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला पाच वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा, गोवा मुंबई रेल्वेचाही समावेश
- PM Inaugration Vande Bharat : चेन्नई-कोईम्बतूर वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
- Ajit Pawar Vande Bharat Express : अन् अजित पवारांनी केला वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास; पाहा व्हिडिओ