मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवार (दि. 19 जानेवारी)रोजी मुंबईत आहेत. या दौऱ्यासाठी भाजपकडून तयारी करण्यात आली आहे. तसेच, मुंबई पोलिसांकडूनही हा दौरा व्यवस्थित होण्यसाठी विषेश तयारी करण्यात आली आहे. येथील बीकेसी एमएमआरडीए मैदानावर पंतप्रधान जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर ते मेट्रो ७चे उद्घाटन करणार आहेत. या सर्व कार्यक्रात मुंबई पोलिसांनी ड्रोन, पॅराग्लाइडर, रिमोट कंट्रोल मायक्रोलाईटर, एअरक्राफ्ट हे संसाधन वापरण्यावर बंदी घातली आहे.
प्रत्येक घटनेचे अपडेट खालीलप्रमाणे
03 : 45
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीकेसी येथील कार्यक्रमात एक कमान कोसळली आहे. स्टेजच्या मागच्या बाजूने बांधलेली लोखंडी कमानी कोसळली आहे. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी असल्याची माहिती आहे.
03:28 PM
नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच स्वागत करण्यासाठी विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल उपस्थित राहणार आहेत. तर भाजपा आणि शिंदे गटाचे सगळे मंत्री व्यासपीठावर करणार मोदींच स्वागत आहेत.
03:25 PM
निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच पंतप्रधान मुंबईत, भास्करराव जाधव यांचा हल्लाबोल
कोरोनाच्या काळात मुंबई मोठ्या संकटात, पण नरेंद्र मोदी मुंबईत आले नाहीत. कोरोनाकाळात मोदी साहेबांनी विशेष काळजी मुंबईत घेतलेली नाही.पूर्वी शिवसेनेने जी काम आखली होती त्यांचेच उद्घाटन करण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत.निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वक्तव्य करायची, ही नरेंद्र मोदी यांचे खासियत आहे.
01:55 PM
...हीच शिवसेनेची ताकद : अंबादास दानवे
मुंबई पालिका निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत, हीच शिवसेनेची ताकद आहे, असे शिवसेनेचे ठाकरे गटातील नेते अंबादास दानवे म्हटले आहे.
01:40 PM
सभेच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आज दुपारी 4 वाजता नरेंद्र मोदी यांची सभा पार पडणार आहे. सभेच्या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला आहे. सभेला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्क्रीनिंग होत आहे. दरम्यान, सभेच्या ठिकाणी कार्यकर्ते, लाभार्थी यांच्यासाठी वेगवेगळी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
12:43 PM
कार्यक्रमाआधीच विरोधक नाराज
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाआधीच विरोधक नाराज झाले आहेत. मुंबईतील विरोधी पक्षातील खासदार, आमदाराचे निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी निमंत्रण द्यायला आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना विचारला जाब विचारल्याचे समजते. दरम्यान, खासदार अरविंद सावंत, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने शिवसेना ठाकरे गटात नाराजी आहे.
12:36 PM
कल्याण, डोंबिवलीमधून 150 पेक्षा अधिक बसेस
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी कल्याण, डोंबिवलीमधून 150 पेक्षा अधिक बसेस येणार आहेत. स्थानिक नगरसेवक व पदाधिकारी या बसमध्ये आपल्या परिसरातील कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत येणार आहेत.
12:03 PM
शिंदे गटांच्या नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाचे दर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटांच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले आहे.
11:47 AM
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आजचे कार्यक्रम
दुपारी 4.40 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबई विमानतळावर स्वागत करणार
सायं. 5 : मुंबईतील विविध प्रकल्पांचे लोकार्पण/भूमिपूजन/लाभ वितरण व सभा, बीकेसी, मुंबई
सायं. 6.30 : मुंबई मेट्रो मार्गिका 2 अ आणि 7 चे लोकार्पण, गुंदवली मेट्रो स्टेशन, अंधेरी, मुंबई
सायं. 7.20 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोप देण्यासाठी मुंबई विमानतळावर उपस्थित राहणार.
11:35 AM
मुंबईतील 'या' बॅनर्सची चर्चा
मुंबईतील गिरगाव आणि मरीन लाइन्स येथे बॅनर्स लावण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील आगमनापूर्वीच हे बॅनर्स लावण्यात आली आहेत. बाळासाहेबांपुढे मोदींची मान झुकते, अशा आशयाचे हे बॅनर्स झळकवण्यात आले आहे. त्यामुळे या बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
11:21 AM
'निर्धार सरकारचा कायापालट मुंबईचा'
नरेंद्र मोदी यांची सभा बीकेसी मैदानात होणार आहे. या सभेसाठी भव्य स्टेजची उभारणी करण्यात आली आहे. या स्टेजच्या खाली 'निर्धार सरकारचा कायापालट मुंबईचा' असा स्लोगन लिहण्यात आला आहे. तसेच, भव्य रांगोळी सुद्धा काढण्यात आली आहे.
11:19 AM
नरेंद्र मोदींचा आजचा मुंबई दौऱ्याचा कार्यक्रम
दुपारी 4.40 : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आगमनप्रसंगी उपस्थिती, मुंबई विमानतळ.
सायं. 5 : मुंबईतील विविध प्रकल्पांचे लोकार्पण/भूमिपूजन/लाभ वितरण व सभा, बीकेसी, मुंबई.
सायं. 6.30 : मुंबई मेट्रो मार्गिका 2 अ आणि 7 चे लोकार्पण, गुंदवली मेट्रो स्टेशन, अंधेरी, मुंबई.
सायं. 7.20 : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रयाणप्रसंगी उपस्थिती, मुंबई विमानतळ.
10:40 AM
... हे शिवसेनेचे यश', संजय राऊतांचा निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावर शिवसेनेचे ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. अनेक प्रकल्पाची योजना पायाभरणी सुरुवात अनेक अडथळे पार करून शिवसेनेची सत्ता असताना महानगरपालिकेने केलेली आहे आणि त्यातील प्रमुख कामांचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, हे शिवसेनेचे यश आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याला आमचा विरोध नसून राजकारण केल्यास बघू, असे संजय राऊत यांनी सांगितले. याशिवाय, बेळगावमधील मराठी बांधवांवरती अत्याचार करू नका, अशी सूचना देऊन त्याबाबत महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांनी घोषणा करावी, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
10:14 AM
नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात अफवा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही बिजनेस संस्था आणि आस्थापना बंद राहतील अशा अफवांचे मेसेज व्हायरल होत आहेत. दरम्यान, मुंबईत सर्व आस्थापने सुरळीत सुरू असून अफवावर विश्वास ठेवू नका असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
10:00 AM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विट
माननीय पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या मुंबईत ३८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार असून या विकासकामांमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
09:44 AM
250 हून अधिक एसटी बसेसची बुकिंग
पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी 250 हून अधिक एसटी बसेसचे बुकिंग करण्यात आले आहे. दसरा मेळाव्यानंतर पुन्हा एकदा गाड्यांची बल्क बुकिंग करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातून या एसटी बसेस येणार आहेत.
09:42 AM
मुंबईत प्रचंड बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त मुंबईत प्रचंड पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंबईत साडेचार हजार पोलिस तैनात असतील. तर
भाजपचे स्वयंसेवकही तैनात राहणार आहेत. तसेच, या सभेला दीड लाख लोक येण्याचा अंदाज वर्तविण्यात येणार आहे.
09:37 AM
रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
- ३९७ किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात येईल. या उपक्रमामुळे मुंबई खड्डेमुक्त होण्यास मदत होईल.
- या कामांसाठी अंदाजे ६,०७९ कोटी इतका खर्च येईल. पुढील २४ महिन्यांत हे काम पूर्ण होईल. या कामांतर्गत शहर भागात ७२ किमी.
- लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. पूर्व उपनगरात ७१ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत, तर पश्चिम उपनगरात २५४ किमी लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत.
- यांनुसार तीनही क्षेत्रात एकूण ३९७ किमी. लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत.
09:36 AM
या प्रकल्पांचे भूमिपूजन
- १७ हजार १८२ कोटींचे ७ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प- पालिकेच्या तीन रुग्णालयांचे १ हजार १०८ कोटींचे बांधकाम.
- ६,०७९ कोटी रुपयांची सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील १ हजार ८१३ कोटींच्या पुनर्विकासाचे काम.
09:36 AM
या प्रकल्पांचे होणार लोकार्पण
- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्गिका २ अ म्हणजेच दहिसर पूर्व - डी. एन. नगर या ६ हजार ४१० कोटींच्या प्रकल्पासह मेट्रो मार्ग ७ म्हणजे अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व हा ६ हजार २०८ कोटींचा मेट्रो प्रकल्प.