ETV Bharat / bharat

Yashwant Sinha : देशाला मूक राष्ट्रपतीची गरज नाही : यशवंत सिन्हा - काँग्रेस आमदारांशी संवाद साधला

रायपूरमध्ये विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा ( Presidential candidate Yashwant Sinha ) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रपतीपदाते महत्त्व आणि त्याच्या जबाबदाऱ्या सांगितल्या. देशाच्या विकासात योग्य तो सल्ला देणारा राष्ट्रपती हवा आहे. असे त्यांनी सांगितले.

Yashwant Sinha
यशवंत सिन्हा
author img

By

Published : Jul 2, 2022, 9:57 AM IST

रायपूर (छत्तीसगड) : विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा ( Oppositions Presidential Candidate Yashwant Sinha ) शुक्रवारी छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये ( Yashwant Sinha In Chhattisgarh ) होते. यावेळी त्यांनी छत्तीसगडशी त्यांचे विशेष नाते असल्याचे सांगितले. ६० वर्षांपूर्वी भिलाईमध्ये त्यांचे लग्न झाले. त्यामुळे छत्तीसगडबद्दल विशेष प्रेम असल्याच त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आगामी राष्ट्रपती निवडणूकांवरही भाष्य ( Yashwant Sinha On Presidential Election ) केले.

बिनविरोध निवडणूक झाली असती तर बरे झाले असती - यशवंत सिन्हा म्हणाले की, "राष्ट्रपती पद आणि त्याचे कार्य हे अत्यंत प्रतिष्ठेचे कार्य आहे. या पदासाठी निवडणूक झाली नसती तर बरे झाले असते असे मत त्यांनी व्यक्त केले. विचारविनिमय करण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची होती. राष्ट्रपतींची काही कर्तव्येही राज्यघटनेत विहित केलेली आहेत. देशाने मूक राष्ट्रपतीही पाहिले आहेत आणि ज्यांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडी नाही. काही कर्तूत्ववान राष्ट्रपतीही देशाला मिळाले आहेत. अशा भावना त्यांनी मांडल्या.

नावाच्या घोषणेपूर्वी झाली बैठक - यशवंत सिन्हा शुक्रवारी रायपूरमध्ये असताना त्यांनी छत्तीसगडमधील काँग्रेस आमदारांशी संवाद साधला ( Yashwant Sinha Interacts Chhattisgarh Congress MLAs ) आणि राष्ट्रपती निवडणुकीसाठी पाठिंबा मागितला. यशवंत सिन्हा म्हणाले की, "केंद्रातील विरोधी पक्षांच्या दोन बैठका झाल्या. त्याशिवाय काही अनौपचारिक भेटीगाठीही झाल्या. यात मला त्यांचा कॉमन उमेदवार व्हायचे आहे का अशी विचारणा झाली. मी होकार दिल्यावर त्यांनी माझे नाव जाहीर केले. मात्र काही वेळाने सत्ताधारी पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला. आणि परिणामी निवडणुका लावण्यात आल्या.

निवड झाल्याचा अभिमान वाटतोय - यशवंत सिन्हा म्हणाले की, "विरोधी पक्षांनी मला त्यांचा उमेदवार म्हणून निवडल्याचा मला अभिमान वाटतो. मी तुमच्या प्रयत्नात कमी पडणार नाही. 27 जून रोजी आम्ही अर्ज भरले आणि 28 जून रोजी दौऱ्यावर निघालो. तेव्हापासून विविध ठिकाणी दौरे सुरू आहेत. 18 जुलैपर्यंत हे दौरे सुरू राहणार आहेत.

खासदार आणि आमदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न - विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर यशवंत सिन्हा सातत्याने अनेक राज्यांमध्ये जाऊन भेटीगाठी घेत आहेत. एनडीएमध्ये सहभागी असलेल्या पक्षांच्या खासदार आणि आमदारांना त्यांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन ते करत आहेत. नुकतेच ते चेन्नईला गेले होते. चेन्नईहून ते रायपूरला पोहोचले.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक कधी? - आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एकूण 115 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी १५ जूनपासून सुरू झालेली नामांकन प्रक्रिया २९ जून रोजी संपली. त्याचवेळी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) आणि विरोधीपक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांची नावे पुढे आली. त्यांच्या नामांकनाबाबत सर्व प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण केल्या आहेत. 18 जुलैला मतदान होणार आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रानंतर आता भाजपचे पुढचे टार्गेट ठरले.. 'या' राज्यात सत्ता आणण्यासाठी तयारी.. मोदींचा आज दौरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.