प्रयागराज : प्रयागराजमध्ये शुक्रवारी नमाजानंतर झालेल्या गोंधळानंतर पुन्हा एकदा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात ( prayagraj friday prayers ) आला. येथील शिवकुटी येथील प्रसिद्ध कोटेश्वर महादेव मंदिराच्या शिवलिंगावर काही अज्ञातांनी अंडी ठेवली ( egg found on shivling ) होती. ती अंडी एका भक्ताने पाहिली. त्यानंतर त्यांनी पुजार्याला सांगितले आणि तेथून अंडी फेकून दिली. मंदिराच्या पुजाऱ्याने ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून धार्मिक उन्माद पसरवल्याचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
लोकांमध्ये प्रचंड नाराजी : पुजाऱ्याने सांगितले की, मंदिराच्या 6 फूट उंच भिंतीवर चढल्यानंतर मंदिराच्या आत असलेल्या शिवलिंगावर कोणीतरी अंडे ठेवले होते. या कृत्याने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, तो कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ दिला जाणार नाही. शिवकुटी येथील प्रसिद्ध कोटेश्वर महादेव मंदिराला मानाचे स्थान आहे. त्यामुळे या घटनेबाबत स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सीसीटीव्ही फुटेजचे स्कॅनिंग : पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी पुजाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी मंदिरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र खराब असल्याने ते फुटेज सापडले नाही. पोलिस तज्ज्ञांच्या मदतीने सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्डिंग आहे की नाही हे शोधून काढणार आहेत. मंदिराच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या इतर सीसीटीव्हींच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. यासोबतच ही केवळ खोड आहे की, वातावरण बिघडवण्याच्या उद्देशाने कोणीतरी मुद्दाम केले आहे, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. सध्या मंदिराबाहेर सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
'कोटेश्वर महादेव' हे भगवान रामाने स्थापित केलेले शिवलिंग आहे. शिवकुटी परिसरात गंगा नदीच्या काठावर कोटेश्वर महादेव मंदिराची स्थापना आहे. असे मानले जाते की प्रयागराजमध्ये भगवान श्री रामाने हे शिवलिंग स्थापित केले आणि ब्रह्महत्यापासून मुक्तीसाठी त्याची पूजा केली.