ETV Bharat / bharat

Shivpal Yadav Follows Top BJP Leaders : शिवपाल यादव यांनी ट्वीटरवर फॉलो केले भाजपच्या मोठ्या नेत्यांना; भाजपत प्रवेश करण्याची शक्यता! - प्रगतीशील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष शिवपाल यादव

प्रगतीशील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष शिवपाल यादव यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांना ट्विटरवर फॉलो करण्यास ( Shivpal Yadav Follows Top BJP Leaders ) सुरुवात केली. भाजपकडून हिरवा कंदील मिळताच शिवपाल सपाला अलविदा करू शकतात, असे मानले जात आहे.

Shivpal Yadav Follows Top Bjp Leaders
शिवपाल यादव
author img

By

Published : Apr 2, 2022, 6:13 PM IST

लखनऊ - प्रगतीशील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष शिवपाल यादव यांनी घेतल्या निर्णयाने समाजवादी पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे. शिवपाल यादव यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांना ट्विटरवर फॉलो करण्यास सुरुवात ( Shivpal Yadav Follows Top BJP Leaders ) केली. शिवपाल यादव भाजपच्या मोठ्या नेत्यांना फॉलो करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Shivpal Yadav Follows Top Bjp Leaders
शिवपाल यादव यांचे ट्वीटर

भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा - 26 मार्च रोजी लखनऊमध्ये सपा आमदारांच्या बैठकीला निमंत्रित न केल्याने संतप्त शिवपाल यादव इटावा येथे गेले. तेथून त्यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. लखनऊला परतल्यानंतर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि जलशक्ती मंत्री स्वतंत्र देव सिंह यांचीही भेट घेतली. यानंतर शिवपाल यादव लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.

यामुळे शिवपाल नाराज झाले होते - 2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी अखिलेश यादव यांनी शिवपाल सपाच्या गोटात मिसळले होते, त्यामुळे आता काका-पुतण्यातील दरी कमी झाल्याचे बोलले जात होते. शिवपाल यादव यांच्या जवळच्या लोकांना तिकीट न मिळाल्याने आणि स्वतःकडे फारसे लक्ष न दिल्याने शिवपाल पुन्हा एकदा अखिलेश यादव यांच्यावर नाराज झाले आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर सपा विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि त्यांना बोलावण्यात आले नाही. शिवपाल यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत भाजप नेत्यांची भेट घेतली. भाजप नेत्यांची भेट घेतल्यानंतर मुलायम यांनी शिवपाल यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा - Mumbai Metro New Lines : मुंबईत दोन नव्या मेट्रो लाईन्सचे उद्घाटन.. मुख्यमंत्री ठाकरेंनी दाखवला हिरवा झेंडा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.