नवी दिल्ली/नोएडा - उत्तराखंड राज्यातील एका 19 वर्षीय मुलाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ( Pradip Mehra Video Viral ) विशेष म्हणजे तो जे करतोय त्याचं अनेक मान्यवरांनी कौतुक केलंय. प्रदीप मेहरा असे या 19 वर्षीय मुलाचे नाव आहे.
या तरुणाने काय केले?
19 वर्षीय प्रदीप मेहरा हा उत्तराखंड राज्यातील अल्मोरा जिल्ह्यातील रहिवासी आहे. मात्र, सध्या तो नोएडा येथील सेक्टर 16च्या एका रेस्टॉरंटमध्ये काम करतो. मात्र, यासोबतच तो सैन्यदला जाण्यासाठी तयारी करत आहे. रेस्टॉरंटमधून घरी जाताना तो चालत न जाता, किंवा कुठल्याही वाहनाने न जाता तो धावत जातो. हा त्याचा नित्यक्रम आहे. 20 मार्चला संध्याकाळी 6 वाजून 53 मिनिटांच्या सुमारास असे काही झाले की हा मुलगा ट्विटरवर हिरो होतो.
फिल्म निर्माते विनोद कापरी यांनी 19 मार्चला रात्री 12 वाजताच्या सुमारास रस्त्यावर एका मुलाला पाठीवर बॅग घेऊन धावताना पाहिले. यावेळी त्यांनी प्रदीपला लिफ्ट ऑफर केली. मात्र, त्याने त्यांना विनम्रतापूर्वक नकार दिला. यावेळी त्याने नकार दिल्याचे कारण सांगितल्यावर या घटनेच्या व्हिडिओ सर्वांनी पाहिल्यावर विनोद कापरी यांच्यासह सर्वांनीच त्या मुलाला सलाम केला आहे. या घटनेचा व्हिडिओ देशात व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रसिद्ध क्रिकेटर हरभजन सिंह, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, वरिष्ठ कांग्रेस नेता हरीश रावत यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रदीपचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.