नवी दिल्ली - भारतात मागील 24 तासात 3,06,064 नवे रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत 27 हजार 469 कमी रुग्णांची नोंद झाली ( India Corona Updates ) असून दिवसभरात 439 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकुण सक्रीय रूग्णांची संख्या 3 कोटी 95 लाख 43 हजार 328 इतकी आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात रूग्ण बरे होण्याचा दर 17.78 टक्क्यांवरून 20.75 इतका झाला आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत देशभरात 162.26 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. देशातील जवळपास 72 टक्के लसीकरण झाले आहे. तसेच 15 ते 18 वयोगटातील 52 टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
162 कोटी लसीचे डोस देण्यात आले -
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 23 जानेवारी 2022 पर्यंत देशभरात कोरोना लसीचे 162 कोटी 26 लाख 7 हजार डोस देण्यात आले आहेत. शेवटच्या दिवशी २७.५६ लाख लसीकरण करण्यात आले. त्याच वेळी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, आतापर्यंत सुमारे 71.69 कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत. शेवटच्या दिवशी 14.74 लाख कोरोना नमुन्याच्या चाचण्या करण्यात आल्या. देशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.24 टक्के आहे, तर बरे होण्याचे प्रमाण 93.07 टक्के आहे. सक्रिय प्रकरणे 5.69 टक्के आहेत. कोरोना अॅक्टिव्ह केसेसच्या बाबतीत भारत आता जगात सहाव्या स्थानावर आहे. एकूण संक्रमित संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.