ETV Bharat / bharat

Singer KK passes away: लोकप्रिय गायक केके काळाच्या पडद्याआड - Singer KK passes away

लोकप्रिय गायक केके आता या जगात नाहीत. मंगळवारी कोलकाता येथील महाविद्यालयात गाणे गात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ( Singer KK died ) त्यामध्ये त्यांची प्राणजोत मालवली. ते 53 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Singer KK passes away
Singer KK passes away
author img

By

Published : Jun 1, 2022, 7:27 AM IST

Updated : Jun 1, 2022, 11:45 AM IST

कोलकाता - लोकप्रिय गायक केके यांचे मंगळवार (31 मे)रोजी वयाच्या ५३ व्या वर्षी स्टेज शो करत असताना निधन झाले. कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमात ते गात होते. ( Singer KK passes away ) हा कार्यक्रम चालू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे ते कोसळले. त्यांला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, तेथे त्यांना मृत घोषीत करण्यात आले. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.


आरडी बर्मन यांचा प्रभाव - गायक केके यांचे पूर्ण नाव कृष्णकुमार कुननाथ होते. पण ते गायक केके म्हणून जास्त प्रसिद्ध होते. ते दिल्लीचे रहिवासी होते. तेथील किरोरी माल महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच प्रसिद्ध गायक किशोर कुमार आणि संगीतकार आरडी बर्मन यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. ( Popular singer KK dies in Kolkata ) प्रथमच द्वितीय वर्गात शिकत असताना त्यांनी स्टेपवर गाण्याचा परफॉर्मन्स दिला. त्यानंतर हळूहळू गाण्याचा छंद इतका वाढला की त्यालाच त्यांनी करिअर बनवले.

  • Saddened by the untimely demise of noted singer Krishnakumar Kunnath popularly known as KK. His songs reflected a wide range of emotions as struck a chord with people of all age groups. We will always remember him through his songs. Condolences to his family and fans. Om Shanti.

    — Narendra Modi (@narendramodi) May 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


1994 मध्ये त्यांनी मुंबईत आले - विशेष म्हणजे गायक होण्याआधी त्यांनी जवळपास 8 महिने सेल्समन म्हणून काम केले होते. मात्र, त्यांना ते काम करावेसे वाटले नाही आणि त्यांचे खरे प्रेम गाणे हेच आहे हे त्यांच्या लक्षात आले. 1994 मध्ये त्यांनी मुंबई गाठली आणि त्यानंतर गायिका शिबानी कश्यपसोबत जिंगल्स गाण्यास सुरुवात केली. ( singer KK's song ) त्यांच्या पत्नी व कुटुंबीयांनीही या कामात पूर्ण सहकार्य केले. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर गुजराती, तेलुगू, तामिळ, कन्नड, मराठी, बंगाली आणि मल्याळम गाण्यांनाही आपला आवाज दिला.


'हम दिल दे चुके सनम' - केके यांच्या गाण्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी ३ हजारहून अधिक जिंगल्स गायल्या होत्या. 1999 मध्ये त्यांनी संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील 'तडप-तडप' हे गाणे गायले होते. ज्याला पहिल्यांदाच देशभरात मान्यता मिळाली. त्याच वर्षी त्यांचा एक अल्बमही रिलीज झाला. या अल्बममधील 'याद आएगा वो पल' हे गाणे तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाले. आजही शाळा-महाविद्यालयांच्या निरोप समारंभात गायले जाणारे हे लोकप्रिय गाणे आहे.

  • #WATCH | Singer KK died hours after a concert in Kolkata on May 31st. The auditorium shares visuals of the event held some hours ago. KK was known for songs like 'Pal' and 'Yaaron'. He was brought dead to the CMRI, the hospital told.

    Video source: Najrul Manch FB page pic.twitter.com/YiG64Cs9nP

    — ANI (@ANI) May 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


मार्केटिंगची नोकरी केली - बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायकाचे तरुण वयात निधन हा सर्वांसाठीच मोठा धक्का आहे. केकेने आपल्या गायन कारकिर्दीत अशी अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. ज्यामुळे देशभर त्याचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. केके यांना लहानपणापासूनच संगीताची आवड असल्याने ते जुन्या कॅसेट प्लेअरमध्ये खूप गाणी ऐकायचे. कॉलेजमध्ये मित्रांसोबत एकत्र परफॉर्म करायचे. परंतु, खर्च भागावा या भावनेने त्यांनी मार्केटिंगची नोकरी केली. त्यानंतर त्यांचे गाणे गाण्यावर जास्त प्रेम होते. शेवटी ते त्याकडे वळले व त्यालाच करिअर बनवले.

तोपर्यंत ऐकणाऱ्याला कसे बरे वाटेल? - माझ्या मते, चांगला गायक तोच असतो जो संगीतकाराचे गाणे स्वतःचे गाणे आहे अशा भावनेने गाऊ शकतो. कदाचित गाणे आनंदी असेल आणि तुमचा मूड वेगळा असेल तर काय होणार? म्हणून मी दिवसातून फक्त एकच गाणे रेकॉर्ड करत असतो. तसेच, जोपर्यंत गायकाला गाणे स्वत: अनुभवता येत नाही, तोपर्यंत ऐकणाऱ्याला कसे बरे वाटेल? अशी भावना त्यांनी गाण्याबद्दल व्यक्त केली होती.

हेही वाचा - यूपीएससी टॉपर प्रियंवदाने म्हाडदळकर यांच्या यशात वडिलांची प्रेरणा महत्वाची

Last Updated : Jun 1, 2022, 11:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.