चेन्नई : दक्षिण चित्रपट सृष्टीतून दुखःद बातमी समोर आली आहे. अयार लांटुम भागातील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रसिद्ध पार्श्वगायिका वाणी जयराम (78) यांचे निधन झाले. काल रात्री घराला कुलूप लावून आतून झोपल्या होत्या. मात्र आज सकाळी अकरा वाजता घरातील कर्मचारी घराची साफसफाई करण्यासाठी आले असता बराच वेळ दरवाजा न उघडला नाही. त्यामुळे बहिण उमाला माहिती दिली. दुसऱ्या चावीने दार उघडले असता कपाळावर जखमा असलेल्या अवस्थेत त्या पडल्या होत्या. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी किलपक्कम सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.
वाणी जयराम यांची कारकीर्द : वाणी जयराम या दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायिका म्हणून प्रसिद्ध होत्या. वाणी जयराम यांची कारकीर्दीला 1971 साली सुरूवात झाली. कारकीर्दीनंतर तब्बल चार दशकाहूंन अधिक काळ वाणी यांची बहरली. 1970 च्या दशकापासून ते 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात वाणी भारतातील अनेक संगीतकारांच्या आवडत्या गायिका मानल्या जात होत्या. वाणी जयराम यांनी हिंदी व्यतिरिक्त, त्यांनी तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, मराठी, ओडिया, गुजराती आणि बंगाली अशा अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित : वाणीने तीनदा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला. तसेच त्यांनी ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांमधून राज्य सरकारचे पुरस्कारही जिंकले. जयराम वाणी यांना 2012 मध्ये त्यांच्या गायन क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने दक्षिण भारतीय चित्रपट संगीतमधून सन्मानित करण्यात आले. जयराम वाणी यांना 1980 मध्ये मीरा (1979) साठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मराठीतून गायलेली गाणी : वाणी जयराम यांना आधुनिक भारताची मीरा म्हणून देखील संबोधले जात होते. दाक्षिणात्य कलाकार असूनही गायिका वाणी जयराम यांचे मराठी संगीत क्षेत्रात मोठे योगदान होते. संगीतकार वसंत देसाई यांना त्यांच्या आवाजातील व्याकुळता आणि पोत आवडला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिची सुरुवातीची वाटचाल इथे सुरू झाली होती. केवळ वसंत देसाई यांनी आपल्या आवाजावर आणि सांगितिक प्रतिभेवर घेतलेल्या परिश्रमांमुळे आपली कारकीर्द यशस्वी ठरली अशा शब्दांत वाणी जयराम यांनी कृतज्ञता व्यक्त केली होती. मराठीत गायलेल्या गाण्यांपैकीच एक हे 'ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी' हे 'देव दीनाघरी धावला' या नाटकातील गाणे होते.