गाजियाबाद (नवी दिल्ली) - दिल्ली-एनसीआर मध्ये प्रदूषणाचा स्तर हा वाढतच चालला आहे. गाजियाबादमध्ये एयर क्वालिटी इंडेक्स हे 'गंभीर' श्रेणीत गेला आहे. गाजियाबाद येथे एयर क्वालिटी इंडेक्स (AQI) 393 नमूद करण्यात आली आहे.

गाजियाबादमध्ये प्रदूषणाचा थैमान हे वाढतच आहे. प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी जिल्हा प्रशासन हे युद्धपातळीवर काम करत आहेत. परंतु, प्रदूषण स्तर कमी होताना दिसत नाही आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डने दिलेल्या माहितीनूसार आज गाजियाबादचे प्रदूषण स्तर हे गंभीर श्रेणीत नोंदवण्यात आले आहे. जे 393 आहे. गाजियाबादच्या लोणी या परिसरात Air Quality Index 428 नमुद करण्यात आले आहे. जे देशातील सर्वात अधिक आहे.
गाजियाबाद मधील प्रदूषणाचा स्तर :
- इंदिरापूरम : 381
- वसुंधरा : 394
- संजय नगर : 368
- लोणी : 428
मागील एक आठवड्यापासून दिल्ली-NCR प्रदूषणाचा मार सहन करत आहे. लगातर वाढत असलेल्या प्रदूषणांच्या स्तरामुळे दिल्लीवासियांना आरोग्याशी निगडीत समस्यांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात दिल्ली एनसीआर चा प्रदूषणाचा स्तर अजून खाली जाण्याची शक्यता आहे.
देशातील सर्वात प्रदूषित परिसर गाजियाबादमधील लोणी
- लोणी, गाजियाबाद : 428
- बागपत : 412
- पानीपत : 400
- दिल्ली : 355
एयर क्वालिटी इंडेक्स जेव्हा 0-50 असते तेव्हा त्या परिसरातील वातावरण 'चागंला' श्रेणीत आहे असे मानल्या जाते. 51-100 मध्ये 'साधारण', 101-200मध्ये 'मध्यम', 201-300मध्ये 'वाईट', 301-400मध्ये 'अत्यंत वाईट', 400-500मध्ये 'गंभीर' आणि 500 च्या वरती एयर क्वालिटी इंडेक्सला 'खूप गंभीर' मानल्या जाते.
हेही वाचा - राहुल गांधींना कशाची भीती वाटते? प्रशांत किशोर यांनी 'हे' दिले उत्तर