ETV Bharat / bharat

Shashi Tharoor Vs Mallikarjun Kharge : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिग्विजय सिंह क्लिन बोल्ड; मल्लिकार्जुन खर्गेंची मैदानात एन्ट्री - Shashi Tharoor and Mallikarjun Kharge

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ( Congress President Election ) दिग्विजय सिंह ( Digvijay Singh ) क्लिन बोल्ड झाले आहेत. तर, मल्लिकार्जुन खर्गेंची मैदानात एन्ट्री झाली आहे. तसेच शशी थरूर ( Shashi Tharoor ) विरुद्ध मल्लिकार्जुन खर्गे ( Mallikarjun Kharge ) असा राजकीय सामना ( Shashi Tharoor Vs Mallikarjun Kharge) आता पाहायला मिळणा आहे.

Shashi Tharoor Vs Mallikarjun Kharge
शशी थरूर विरुद्ध मल्लिकार्जुन खर्गे
author img

By

Published : Sep 30, 2022, 2:06 PM IST

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे ( Congress President Election ) ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे ( Mallikarjun Kharge ) यांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच शशी थरूर ( Shashi Tharoor ) विरुद्ध मल्लिकार्जुन खर्गे असा राजकीय सामना ( Shashi Tharoor Vs Mallikarjun Kharge ) आता पाहायला मिळणा आहे. अध्यक्ष पदाच्या शर्यतीत असणारे दिग्विजय सिंह ( Digvijay Singh ) यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचे जाहीर केले आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून वेगवान घडमोडी घडत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर आहे.

दलित चेहऱ्याला उमेदवारी - काँग्रेस अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काँग्रेस खासदार शशी थरूर राजघाटावर पोहोचले. येथे त्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. आज दुपारी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मल्लिकार्जुन खर्गे किंवा अन्य कोणत्याही दलित चेहऱ्यालाही पक्षाध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनियांची भेट घेतली आहे.

मल्लिकार्जुन 8 वेळा आमदार - मल्लिकार्जुन यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा अंतिम निर्णय सोनिया गांधी घेतील. खरगे हे 8 वेळा आमदार, दोन वेळा लोकसभेचे खासदार आणि एक वेळ राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतच त्यांचा पराभव झाला आहे. खर्गे हे दलित नेते आहेत. ते कर्नाटकचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्रीही राहिले आहेत. मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी राज्यातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक न घेतल्याबद्दल पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची माफी मागितली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.