ETV Bharat / bharat

Goa Assembly election 2022 : महाराष्ट्राप्रमाणे गोव्यामध्ये महाविकास आघाडी होईल का, जाणून घ्या राजकीय विश्लेषकांचा अंदाज - गोवा विधानसभा निवडणूक विश्लेषण

गोव्यामध्ये काँग्रेससोबत मिळून विधानसभा निवडणूक ( Goa Assembly election 2022 ) लढवण्यासाठी शिवसेना तयार असल्याचे गेल्या काही दिवसापासून संजय राऊत यांच्याकडून ( Sanjay Raut on Mahavikas aghadi in Goa ) वक्तव्य केले जात आहे. मात्र, गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडानकर आणि दिल्लीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून शिवसेनेला सोबत घेण्याबाबत कोणतेही वक्तव्य केले जात नाही.

गोवा विधानसभा निवडणूक
गोवा विधानसभा निवडणूक
author img

By

Published : Jan 12, 2022, 3:35 PM IST

Updated : Jan 12, 2022, 4:16 PM IST

मुंबई - महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडी ( possibility Formation of Mahavikas Aghadi in Goa ) व्हावी, यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गोव्याचे राजकीय समीकरण पाहता गोव्यामध्ये महाविकास आघाडी निर्माण होण्याची चिन्हे धूसर असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त ( Political Analysis on formation of Mahavikas Aghadi ) केले जात आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी तयार करत सत्ता प्रस्थापित केली. तेच सूत्र गोव्यामध्येदेखील झाले पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP president on Mahavikas aghadi in Goa ) यांनी सांगितले. मात्र, गोव्याचे राजकीय समीकरण, सामाजिक परिस्थिती व राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे असलेले अस्तित्व हे पाहता गोव्यामध्ये काँग्रेसही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेण्यात सध्यातरी उत्सुक दिसत नाही. जास्तीत जास्त काँग्रेस ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेईल, असे चित्र येणाऱ्या काही दिवसात गोव्यामध्ये पाहायला मिळेल. मात्र, गोव्यामध्ये महाराष्ट्राप्रमाणेच महाविकास आघाडी तयार होण्याचे चित्र धूसर असल्याचे मत राजकीय विश्लेषक श्रीराम पचेन्द्रे यांनी व्यक्त केल आहे.

हेही वाचा-Goa Assembly Election 2022 : गोव्याच्या निवडणुकीत शिवसेना डॅमेज फोर्स'च्या भूमिकेत

गोव्यात शिवसेनेची काँग्रेसला हाक-
गोव्यामध्ये काँग्रेससोबत मिळून विधानसभा निवडणूक ( Goa Assembly election 2022 ) लढवण्यासाठी शिवसेना तयार असल्याचे गेल्या काही दिवसापासून संजय राऊत यांच्याकडून ( Sanjay Raut on Mahavikas aghadi in Goa ) वक्तव्य केले जात आहे. मात्र, गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडानकर आणि दिल्लीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून शिवसेनेला सोबत घेण्याबाबत कोणतेही वक्तव्य केले जात नाही. शिवसेनेकडून केवळ पाच जागांची मागणी आहे. तरीदेखील काँग्रेसकडून शिवसेनेकडे कानाडोळा केल्याचे चित्र गोव्यामध्ये आहे. काँग्रेस गोव्यामध्ये शिवसेनेला सोबत घेण्याच्या मनस्थितीत नाही. शिवसेना हा गोव्याच्या बाहेरील पक्ष आहे. गोव्याची सामाजिक परिस्थिती पाहता अजूनही गोव्याच्या जनतेने शिवसेनेला स्वीकारलेले नाही. याची कल्पना काँग्रेस पक्षाला आहे. त्यामुळे गोव्यामध्ये काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेतल्यास त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस गोव्यामध्ये शिवसेनेशी दोन हात लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, येणाऱ्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांची आघाडी गोवामध्ये होताना दिसेल. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षाची युतीसोबत चर्चा करत आहे. तरी, तृणमूल काँग्रेसचे गोव्यामध्ये अस्तित्व नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनदेखील काँग्रेससोबत जाण्यासाठीच प्रयत्न केले जात असल्याचे मत राजकीय विश्लेषक श्रीराम पचेन्द्रे यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा-BJP MLA Resigned : भाजपला दुसरा धक्का, आमदाराने दिला राजीनामा, म्हणाले 'पक्षात योग्य वागणूक मिळत नाही'

एकाकी लढून काँग्रेसच्या हाती काय लागेल?
शिवसेनेचे नेते संजय राऊत मंगळवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले, की राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. त्याचप्रमाणे गोव्यामध्ये महाविकास आघाडी व्हावी, यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहे. याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. मात्र, शिवसेना गोव्यामध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यासाठीदेखील तयार असल्याचे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेने गोव्यात प्रचारासाठी तयारीदेखील आहे. प्रचाराची धुरा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे. तसेच शिवसेनेचे इतरही ज्येष्ठ नेते आणि मंत्री गोव्यामध्ये प्रचारासाठी जाणार आहेत. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेच्या युतीच्या प्रस्तावाला नकार दिल्यास स्वबळावर लढण्यासाठी शिवसेनेने तयारी पूर्ण केली आहे. मात्र, एकाकी लढून काँग्रेसच्या हाती काय लागणार? गोवा राज्यात आघाडीमध्ये शिवसेने सारखा हिंदुत्ववादी पक्ष असेल, तर त्याचा फायदा काँग्रेसला नक्की होईल, अशी आशा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

Last Updated : Jan 12, 2022, 4:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.