ETV Bharat / bharat

Goa Election 2022 : सगळी गणितं बिघडवणारी 'गोव्याची निवडणूक' जाणकारांच्या नजरेतून...

author img

By

Published : Feb 12, 2022, 6:09 PM IST

गोवा विधानसभा निवडणूक 2022 साठी (Goa Assembly Election 2022) व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होणार की त्रिशंकू विधानसभा होणार हे 10 मार्चला कळेल. गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election 2022) प्रचाराच्या तोफा आता थंडावत आहेत.

goa election file photo
गोवा निवडणूक फाईल फोटो

पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election 2022) प्रचाराच्या तोफा आता थंडावत आहेत. मात्र, यंदाची निवडणूक ही आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. याचे कारण या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये अस्थिरता असल्याने कोण बाजी मारणार याबाबत अस्पष्टता आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने यंदाची निवडणूक ही सर्व गणिते वेगळी ठरवणारी आहे. गोवा विधानसभा निवडणूक 2022 साठी (Goa Election 2022 voting) व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होणार की त्रिशंकू विधानसभा होणार हे 10 मार्चला कळेल.

पाच राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तरी सर्वांचे लक्ष उत्तर प्रदेश आणि गोवा या दोन राज्यातील निवडणुकांकडे लागून राहिले आहे. याचे कारण उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या निकालावर आगामी निवडणुकांच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. तर गोव्यातील निवडणुकीच्या निकालावर महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रभाव असणार आहे. गोव्यातील निवडणूक ही नेहमीच अटीतटीची होते. गोव्यात काँग्रेस आणि भाजपा या दोन पक्षांमध्ये तुल्यबळ लढत पाहायला मिळत आहे. मात्र, यंदा गोवा विधानसभा निवडणुकीतील सगळी गणिते बिघडलेली आहेत. कारण, भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातून मोठ्या प्रमाणात झालेले पक्षांतर आणि तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी गोव्यात केलेली जोरदार प्रचार मोहीम. त्यामुळे काँग्रेसला बहुमत मिळते की भाजपाला यापेक्षा या अन्य पक्षांच्या कामगिरीमुळे नवीन समीकरणे उदयास येणार आहेत, म्हणूनच यंदाची निवडणूक ही सर्वच पक्षांची गणित बिघडवणारी ठरणार असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

  • काँग्रेसपुढे अडचणी -

गेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तेच्या जवळ जाऊनही सत्ता हस्तगत न करता येणाऱ्या काँग्रेससमोर यंदा अधिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते भाजपाच्या तंबूत दाखल झाले. यामुळे काँग्रेसला दुसऱ्या फळीतील ३८ नेत्यांवर विश्वास ठेवत त्यांना उमेदवारी द्यावी लागली. इतकंच काय पक्षांतराच्या भीतीने धास्तावलेल्या काँग्रेसला उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र घ्यावी लागली. राहुल गांधी आणि प्रियांका गांधींच्या दौऱ्यानंतर नवसंजीवनी प्राप्त झालेल्या काँग्रेसला आपला मतदार आपल्या सोबत आहे की नाही याची तितकीशी खात्री राहिलेली नाही. नवीन उमेदवार किती करिष्मा करू शकतील याबाबतही साशंकता असल्याचे राजकीय विश्लेषक अनिल लाड सांगतात.

  • भाजपामध्ये नाराजांची फौज

सत्तेत असलेल्या भाजपापुढे सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे. हे आव्हान पेलता यावे म्हणून महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून गोव्यात तळ ठोकून आहेत. त्यांच्यासमोर मुख्य अडचण आहे ती भाजपातल्या नाराज नेत्यांची. भाजपामध्ये आयारामांची मोठ्या प्रमाणात बडदास्त ठेवली गेल्याने पक्षातील जुने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. अनेकांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांसोबत किती मतदार आले आणि बंड पुकारलेल्या भाजपामधील नेत्यांचा किती फटका बसणार या विवंचनेत भाजपा पक्ष अडकला असल्याचे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक किशोर नाईक गावकर व्यक्त करतात.

  • पर्रीकर फॅक्टरचा फटका बसणार -

मनोहर पर्रीकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पणजी मतदारसंघात त्यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर भाजपाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांना डावलले गेल्यानंतर मनोहर पर्रीकर यांनी भाजपला दिलेले योगदान आणि भाजपाने केलेली परतफेड याबाबत जनमानसामध्ये मोठी नाराजी पसरली आहे. त्यातच उत्पल पर्रीकर यांना सर्वच पक्षांनी मदतीचा हात दिल्याने भाजप अडचणीत आली आहे. पर्रीकर फॅक्टरचा केवळ पणजीतच नव्हे तर अन्य मतदारसंघांवरही प्रभाव पडणार आहे, असेही नाईक यांनी सांगितले.

  • अन्य पक्षांचाही प्रभाव-

गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षातच लढत होते. एखादा स्थानिक पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन होते अशी आजवरची परंपरा आहे. यंदा मात्र तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनीही मतदारांना विविध आश्वासन देत भुरळ पाडली आहे. या पक्षांनीही यंदा प्रचारात जोरदार आघाडी घेत मतदारांमध्ये संग्रहाचं वातावरण निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. या पक्षांनी जर काही जागा मिळवल्या तर यंदा गोव्यातील सर्वच राजकीय पक्षांची गणितं ही बिघडणार असल्याचं ज्येष्ठ पत्रकार राजन नाईक यांनी सांगितलं.

  • गोवेकरांना काय पाहिजे?

गोव्यातील राजकारणाचा स्तर यंदा बदलला आहे. गोव्यात धर्माच्या अथवा जातीच्या आधारावर किंवा हिंदुत्वाच्या आधारावर निवडणूक लढवली जात नव्हती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत या सर्व मुद्द्यांना स्पर्श केला गेला. पर्यटन, रोजगार आणि संस्कृती रक्षण या मुद्द्यांकडे गोवेकर अधिक आस्थेने पाहतात. त्यामुळे गोवेकरांना नेमकं काय हवंय, हे दिग्गज राजकीय पक्षांना कळलंच नाही, असं मत राजू पेडणेकर यांनी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.