ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ महिन्यानंतर वाराणसी दौऱ्यावर; विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणार - नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर

तब्बल आठ महिन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते 15 हजार कोटी रुपयांच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते गुजरात सायन्स सिटी मधल्या अॅक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरीचे, "रुद्राक्ष" आंतराराष्ट्रीय सहयोग संमेलन केंद्राचे आणि नेचर पार्कचे उद्घाटनही करण्यात येणार आहे.

PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Jul 15, 2021, 7:28 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर आहेत. तब्बल आठ महिन्यानंतर ते वाराणसी दौऱ्यावर आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान मोदींनी वाराणसीचा दौरा केला होते. या दौऱ्यात ते 15 हजार कोटी रुपयांच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते गुजरात सायन्स सिटी मधल्या अॅक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरीचे, "रुद्राक्ष" आंतराराष्ट्रीय सहयोग संमेलन केंद्राचे आणि नेचर पार्कचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण सध्या गरम असून मोदींच्या दौऱयाने घडामोडींचा वेग वाढला आहे. राज्यात पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होणार असल्याने मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे.

गांधीनगर राजधानी रेल्वे स्थानकाचा 71 कोटी रुपये खर्चून पुनर्विकास करण्यात आला असून मोदींच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. या स्थनाकात दिव्यांगांसाठी विशेष तिकीट आरक्षण खिडकी, रॅम्प, उद्वाहने, समर्पित पार्किंग सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. तसेच आणखी गांधीनगर राजधानी- वाराणसी अतिजलद गाडी आणि गांधीनगर राजधानी ते वरेथा दरम्यानच्या मेमू सेवा गाडीला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील.

अॅक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरी

अॅक्वेटिक्स गॅलरीमध्ये महत्वाचे शार्क मासे राहणार आहेत. अद्भुत अनुभव देणारा 28 मीटरचा बोगदाही इथे आहे. तर रोबोटिक्स गॅलरी ही रोबोटिक्स तंत्रज्ञानाचे दर्शन घडवणारी आहे. मानवासारखा रोबो या रोबोटिक्स गॅलरीत पाहायला मिळणार आहे. औषध, कृषी, अंतराळ, संरक्षण क्षेत्रासह आणि दैनंदिन जीवनात उपयोगी ठरणारे रोबो गॅलरीत आहेत.

नेचर पार्क -

नेचर पार्कचे उद्घाटनही मोदी करणार असून या पार्कमध्ये मिस्ट गार्डन, चेस गार्डन, सेल्फी पॉइंट आहे. मुलांसाठी अनोखा भूल भुलैय्या तसेच मॅमोथ, टेरर बर्ड यासारख्या नामशेष झालेल्या प्रजातींची वैज्ञानिक माहितीसह शिल्पेही आहेत.

"रुद्राक्ष" आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्र -

पंतप्रधान उद्या वाराणसीमध्ये जपान आणि भारताच्या सहकार्यातून उभारलेले "रुद्राक्ष" आंतराराष्ट्रीय संमेलन केंद्राचेही उद्घाटन करणार आहेत. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे 2015 मध्ये वाराणसी आले होते. तेव्हा याचा पाया पडला होता. हे केंद्र शिवलिंगाच्या आकृतीप्रमाणे आहे.

पुरातन शहर वाराणसी -

वाराणसी हे कला आणि डिझाइनचे एक प्रमुख केंद्र आहे. ब्रिटिश राजवटीतील लष्करी छावणीची स्मशानभूमी ही वाराणसीच्या कला व शिल्पांचे स्थान आहे. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मियांचे सर्वाधिक लोकप्रिय तीर्थस्थान असलेले तसेच राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्ट्या हजारो वर्षांचा अखंड इतिहास आणि परंपरा असलेले वाराणसीइतके पुरातन शहर भारतात अन्यत्र क्वचितच आढळेल.

हेही वाचा - मोदींचा वाराणसी दौरा; कृषी कायद्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.