ETV Bharat / bharat

'चार वर्षानंतर नोटबंदीचं काय झालं ? पंतप्रधानांनी कागदोपत्री सांगावे' - नोटबंदी बातमी

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान मोदींवर नोटबंदीवरून निशाणा साधला आहे. नोटबंदीचा देशावर काय परिणाम झाला, हे मोदींनी कागदोपत्री सांगावे, असे ते म्हणाले.

अशोक गेहलोत
अशोक गेहलोत
author img

By

Published : Nov 9, 2020, 4:36 AM IST

जयपूर - केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ साली नोटबंदीचा मोठा निर्णय घेतला होता. त्याला आता चार वर्ष पूर्ण झाली आहेत. याचा निषेध म्हणून काँग्रेसने काल (शनिवार) देशभरात 'विश्वासघात दिवस' पाळला. दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान मोदींवर नोटबंदीवरून निशाणा साधला आहे. नोटबंदीचा देशावर काय परिणाम झाला, हे मोदींनी कागदोपत्री सांगावे, असे ते म्हणाले.

आता तरी चुका सुधरा -

नोटबंदीचा मागील चार वर्षात काय परिणाम झाला हे मोदींनी कागदोपत्री सांगावे. केंद्र सरकारने त्यांनी चूक आतातरी दुरुस्त करावी. मग ती चूक वस्तू सेवा करातील, कोरोना काळातील निर्णय किंवा नोटबंदीचा निर्णय असेल, असे गेहलोत म्हणाले. काळा पैसा मोठ्या प्रमाणात साठवला जात आहे. 'इल्ट्रोल बाँड' हा मोठा घोटाळा असून लोकशाहीसाठी घातक आहे. या बाँडद्वारे कोणती कंपनी कोणत्या राजकीय पक्षाला किती पैसे पुरवत आहे, हे समजून येत नाही, असे ते म्हणाले.

ग्रामीण अर्थव्यवस्था ढासळली -

नोटबंदीच्या चार वर्षांनंतर देशातील शेतकरी, कामगार आणि व्यापारी पूर्णत: उद्ध्वस्थ झाला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. खुद्ध रिजर्व बँक ऑफ इंडियाने सांगितले की, नोटबंदीनंतर ९९.३ टक्के पैसे माघारी आले आहेत. डिजियाटझेनही महत्त्वाचे आहे. मात्र, अर्थव्यवस्था पुन्हा कशी उभी करावी, हा मुख्य मुद्दा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.