ETV Bharat / bharat

PM Modi mother Hiraba Health Update: आईला भेटण्यासाठी पंतप्रधान मोदी रुग्णालयात दाखल, राहुल गांधींनीही केले ट्विट - Rahul Gandhi Tweet About Hiraba Modi

PM Modi mother Hiraba Health Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले Hiraba Modi admitted to hospital for treatment आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या आईची भेट घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले PM Modi Reached Ahmedabad आहेत. यापार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

PM Narendra Modi mother Hiraba unwell admitted to hospital for treatment
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईची तब्येत बिघडली.. उपचारासाठी रुग्णालयात दाखल
author img

By

Published : Dec 28, 2022, 1:40 PM IST

Updated : Dec 28, 2022, 4:50 PM IST

अहमदाबाद (गुजरात) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले Hiraba Modi admitted to hospital for treatment आहे. त्यांची तब्येत आता स्थिर असल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादला आले PM Modi Reached Ahmedabad असून, आईच्या तब्येतीची माहिती घेत आहेत. हे सर्व लक्षात घेऊन पोलिसांना सतर्क करण्यात आले असून, सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. नरोडा, सरदारनगर तसेच विमानतळ पोलिसांच्या कर्मचाऱ्यांच्या ठाण्यांना सुरक्षा देण्यात आली असून, युएन मेहता हॉस्पिटलसह पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

  • #WATCH | PM Modi arrives at UN Mehta Institute of Cardiology & Research Centre in Ahmedabad where his mother Heeraben Modi is admitted

    As per the hospital, her health condition is stable. pic.twitter.com/j9Yp3udunB

    — ANI (@ANI) December 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

PM मोदींच्या आई हिराबा यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे त्यांना UN मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यूएन मेहता हॉस्पिटलच्या बुलेटिननुसार, हिराबा यांची प्रकृती सध्या सुधारत आहे. पंतप्रधान मोदींच्या आई 100 वर्षांच्या आहेत. यूएन मेहता रुग्णालयाचे अधिकृत बुलेटिन आले असून, हिराबा यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांची प्रकृती खालावली होती. त्यांनी 108 वर कॉल करून त्यांना गांधीनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. एवढेच नव्हे तर सामान्य रुग्णांप्रमाणेच रुग्णालयातील जनरल वॉर्डात त्यांची तपासणी करण्यात आली होती.

रुग्णालयाने दिलेली माहिती
रुग्णालयाने दिलेली माहिती

पोलिसांचा मोठा बंदोबस्त: मिळालेल्या माहितीनुसार, कैलासनाथन यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. यासोबतच भाजप आमदार दर्शनाबेन वाघेला, आमदार कौशिक जैन हेही रुग्णालयात पोहोचले. पीएम मोदी अहमदाबादला रुग्णालयात आले आहेत. नरोडा, सरदारनगर आणि विमानतळ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडे बंदोबस्त सोपवण्यात आला आहे. यासोबतच यूएन मेहता रुग्णालयात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राहुल गांधींनीही केले ट्विट : दरम्यान मोदींच्या आईची तब्येत खालावल्याचे समजताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींची आई हिराबा यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली. तसेच मोदीजी या परिस्थितीत माझे प्रेम आणि समर्थन हे तुमच्यासोबत आहे, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. Rahul Gandhi Tweet About Hiraba Modi

  • एक मां और बेटे के बीच का प्यार अनन्त और अनमोल होता है।

    मोदी जी, इस कठिन समय में मेरा प्यार और समर्थन आपके साथ है। मैं आशा करता हूं आपकी माताजी जल्द से जल्द स्वस्थ हो जाएं।

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) December 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांच्या घरी जात आईची भेट घेतली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील राणिप येथून मतदान केले. तर नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा देखील मतदानासाठी पोहोचल्या होत्या. त्यांनी गांधीनगर दक्षिण जागेसाठी मतदान केले. 100 वर्षीय हिराबा व्हीलचेअरवर बसून मतदानासाठी आल्या होत्या.

मागच्या भेटीत झाली कौटुंबिक चर्चा : नरेंद्र मोदी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान आई हीराबाला भेटण्यासाठी विमानतळावरून थेट गांधीनगर रायसन गाठले होते. मतदान केल्यानंतर त्यांचे भाऊ सोमाभाई मोदी यांची देखील भेट घेतली होती. ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांच्या भावाने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे आले तेव्हा त्यांचाशी केवळ कौटुंबिक चर्चा झाली. देशाच्या विकासासाठी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. गुजरातचा सातत्यपूर्ण विकास सुरू ठेवण्यासाठी भाजपला मतदान करणे आवश्यक आहे, असे देखील ते म्हणाले होते.

Last Updated : Dec 28, 2022, 4:50 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.