नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑल इंडिया रेडिओचा मासिक रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' च्या 93 व्या आवृत्तीला संबोधित केले. मन की बात या रेडिओ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी चित्ता परत आल्याने आनंद व्यक्त केला आहे. चित्ते पाहण्याची संधी कधी मिळणार हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. ते म्हणाले की, चित्त्यांसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, जो त्यांच्यावर लक्ष ठेवत आहे. ते वातावरणात मिसळले की लगेच त्यांना पाहण्याची संधी मिळेल.
हा सरकारचा पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनासाठी प्रयत्न आहे. सर्व चित्तांवर उपग्रहाद्वारे लक्ष ठेवण्यासाठी रेडिओ कॉलर बसवण्यात आले आहेत. याशिवाय प्रत्येक चित्तामागे एक समर्पित मॉनिटरिंग टीम असते जी 24 तास त्यांच्या स्थानावर लक्ष ठेवतेपंतप्रधानांनी मन की बातमध्ये माय जीओव्ही एप वर चित्त्यांची नावे सुचवण्यासही सांगितले. भारताला वन्यजीव संरक्षणाचा मोठा इतिहास आहे. सर्वात यशस्वी वन्यजीव संरक्षण उपक्रमांपैकी एक 'प्रोजेक्ट टायगर', जो 1972 मध्ये सुरू करण्यात आला होता, त्याने केवळ वाघांच्या संवर्धनासाठीच नव्हे तर संपूर्ण पर्यावरणातही योगदान दिले असेही त्यांनी यावेळी सांंगितले
महान स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली म्हणून चंदीगड विमानतळाला आता शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. ते म्हणाले की 28 सप्टेंबर रोजी भगतसिंग यांची जयंती आहे, त्यां पूर्वी त्यांना श्रद्धांजली म्हणून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणाले. हवामान बदल हा सागरी परिसंस्थेसाठी एक मोठा धोका आहे आणि समुद्रकिनाऱ्यांवरील कचरा त्रासदायक आहे या बद्दलही त्यांनी वक्तव्य करताना सांगितलेकी, या आव्हानांचा सामना करण्यासाठी गंभीर आणि सतत प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे. यावेळी मोदींनी दीनदयाळ उपाध्याय यांना श्रद्धांजली वाहिली त्यांच्या बद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की ते एक प्रगल्भ विचारवंत आणि देशाचे महान पुत्र होते.