अहमदाबाद : पंतप्रधान मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर (PM Modi Gujrat visit) आहेत. या वर्षाच्या अखेरीस भाजपशासित राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान रविवारपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून ते गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील आमोद येथे 8 हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे विविध प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. तसेच अहमदाबादमधील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन (2nd Day Of Gujrat visit) करतील.
मोदींच्या दौऱ्याचा दुसरा दिवस - आज ते (PM Narendra Modi) जंबुसर येथे बल्क ड्रग पार्क आणि भरूच जिल्ह्यातील दहेज येथे खोल समुद्रातील पाइपलाइन प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. जिल्ह्यातील अनेक औद्योगिक उद्यानांच्या विकासाच्या भूमिपूजन समारंभातही ते सहभागी होणार आहेत. अहमदाबादमध्ये, पंतप्रधान मोदी शैक्षणिक संकुल - गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन करणार आहेत. सरकारी प्रकाशनानुसार, या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात मदत होईल. पंतप्रधान मोदी आनंद जिल्ह्यातील वल्लभ विद्यानगर येथे जाहीर सभेला संबोधित करतील. संध्याकाळी जामनगरमध्ये सिंचन, वीज, पाणीपुरवठा आणि शहरी पायाभूत सुविधांशी संबंधित 1,460 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी (Modi 2nd Day Of Gujrat visit) करतील.