ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींनी कॅनडाच्या पंतप्रधानांशी केली चर्चा; म्हणाले लसीकरणात भारत पूर्ण मदत करेल - मोदी ट्रुडो कोरोना संभाषण

पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी कॅनडाच्या पंतप्रधानांना आश्वासन दिले, की भारताने ज्याप्रकारे सर्व देशांना कोरोना लसीकरणासाठी मदत केली. त्याचप्रमाणे कॅनडालाही आम्ही मदत करू.

PM Modi Trudeau talk on Covid-19 vaccines
पंतप्रधान मोदींनी कॅनडाच्या पंतप्रधानांशी केली चर्चा; म्हणाले लसीकरणात भारत पूर्ण मदत करेल
author img

By

Published : Feb 11, 2021, 2:09 PM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. कॅनडामधील कोरोना लसीकरणासाठी भारत सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन मोदींनी यावेळी ट्रुडो यांना दिले.

पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी कॅनडाच्या पंतप्रधानांना आश्वासन दिले, की भारताने ज्याप्रकारे सर्व देशांना कोरोना लसीकरणासाठी मदत केली. त्याचप्रमाणे कॅनडालाही आम्ही मदत करू.

औषधनिर्मिती करण्याच्या भारताच्या क्षमतेचा जगाला फायदा..

ट्रुडो यावेळी म्हणाले, की कोरोनाच्या या लढाईमध्ये जागतिक स्तरावर भारताचे मोठे योगदान असणार आहे. मोठ्या प्रमाणात औषधनिर्मिती करण्याच्या भारताच्या क्षमतेचा जगातील सर्व देशांना फायदा होईल. भारताच्या या क्षमतेचा वापर सर्वांसाठी केल्याबाबत त्यांनी मोदींचे कौतुकही केले. यावर पंतप्रधान मोदींनी ट्रुडोंचे आभार मानले.

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये कोविड महामारीचे आर्थिक दुष्परिणाम आणि इतर काही मुद्द्यांवर चर्चा झाली. यानंतर मोदींनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

हेही वाचा : मोठी बातमी..! लडाखमधील भारत-चीन सीमावादावर तोडगा, सैन्य माघारी घेण्यास सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.