New Delhi: राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवार (दि. 24 एप्रिल)रोजी जम्मू-काश्मीरला भेट देणार आहेत. यामध्ये देशभरातील ग्रामसभांना ते संबोधित करणार आहेत. ( Panchayati Raj Day event ) दरम्यान, ते 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. त्यासोबतच ते सांबा जिल्ह्यातील पल्ली पंचायतीला पंतप्रधान भेट देणार आहेत.
-
PM Modi to visit J-K today to participate in Panchayati Raj Day event
— ANI Digital (@ani_digital) April 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/8JsKuw1fnw#PMModi #JammuAndKashmir #PanchayatiRajDay pic.twitter.com/2tgj0aZBgP
">PM Modi to visit J-K today to participate in Panchayati Raj Day event
— ANI Digital (@ani_digital) April 24, 2022
Read @ANI Story | https://t.co/8JsKuw1fnw#PMModi #JammuAndKashmir #PanchayatiRajDay pic.twitter.com/2tgj0aZBgPPM Modi to visit J-K today to participate in Panchayati Raj Day event
— ANI Digital (@ani_digital) April 24, 2022
Read @ANI Story | https://t.co/8JsKuw1fnw#PMModi #JammuAndKashmir #PanchayatiRajDay pic.twitter.com/2tgj0aZBgP
७५ पाणवठ्यांचे पुनरुज्जीवन केले जाणार - राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान मोदी सांबा जिल्ह्याच्या पल्लीमधून देशभर पंचायतीच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत. ( PM Modi Participate In Panchayati Raj ) पल्लीमधून मोदी अमृत सरोवर योजनेचा प्रारंभ करणार आहेत. या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील ७५ पाणवठ्यांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.
-
Jammu & Kashmir | Security checks are underway at the venue in Palli village in Samba from where PM Modi will address the panchayats across the nation on the occasion of Panchayati Raj Diwas pic.twitter.com/Z3MDqDcjSO
— ANI (@ANI) April 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Jammu & Kashmir | Security checks are underway at the venue in Palli village in Samba from where PM Modi will address the panchayats across the nation on the occasion of Panchayati Raj Diwas pic.twitter.com/Z3MDqDcjSO
— ANI (@ANI) April 24, 2022Jammu & Kashmir | Security checks are underway at the venue in Palli village in Samba from where PM Modi will address the panchayats across the nation on the occasion of Panchayati Raj Diwas pic.twitter.com/Z3MDqDcjSO
— ANI (@ANI) April 24, 2022
काय असेल कार्यक्रम?
या व्यतिरिक्त 38,082 कोटी रुपयांच्या औद्योगिक विकास प्रस्तावांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यादरम्यान पंतप्रधान 2 जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी करतील आणि त्यासोबत जम्मू-श्रीनगर बोगद्याचे उद्घाटनही करतील. दुबईहून आलेल्या गुंतवणूकदारांसोबत मोदी विशेष बैठक घेणार असल्याचीही बातमी आहे. पुढील विकास योजनांबाबत चर्चा करण्यासाठी ते एमआर ग्रुप, डीपी वर्ल्डच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत.
-
Suspected blast in Jammu village ahead of PM Modi's 1st major J-K visit
— ANI Digital (@ani_digital) April 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/LNr4ts68Z0#PMModi #BlastinJK #JammuAndKashmir pic.twitter.com/rqUWpDqPdP
">Suspected blast in Jammu village ahead of PM Modi's 1st major J-K visit
— ANI Digital (@ani_digital) April 24, 2022
Read @ANI Story | https://t.co/LNr4ts68Z0#PMModi #BlastinJK #JammuAndKashmir pic.twitter.com/rqUWpDqPdPSuspected blast in Jammu village ahead of PM Modi's 1st major J-K visit
— ANI Digital (@ani_digital) April 24, 2022
Read @ANI Story | https://t.co/LNr4ts68Z0#PMModi #BlastinJK #JammuAndKashmir pic.twitter.com/rqUWpDqPdP
१०८ जनऔषधी केंद्रांचेदेखील लोकार्पण - जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी दिल्ली-कटडा एक्सप्रे-वे, दोन जलविद्युत प्रकल्पांचे शिलावरण आणि त्याचबरोबर ३८ हजार कोटी रुपयांचे औद्योगिक योजनांचे भूमीपूजन करणार आहेत. दरमान्य, देश-परदेशातून काही पाहुणे उपस्थित राहणार आहेत. शिवाय काजीगुंड-बनिहाल सुरंग आणि १०८ जनऔषधी केंद्रांचेदेखील लोकार्पण केले जाणार आहे.
भूमी स्वामित्व कार्डचेदेखील वितरण - पल्ली पंचायतीमध्ये जनसभेनंतर पंतप्रधान मोदी ग्रामसभेत सहभागी होणार आहेत. त्यावेळी ते पल्लीत ५०० मेगावॅटचा सोलर प्लांटदेखील लोकार्पण करणार आहेत. यातून पल्ली पंचायत देशात पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत होणार आहे. भूमी स्वामित्व कार्डचेदेखील वितरण केले जाणार आहेत.
मोदींच्या जम्मू दौऱ्याची सुरक्षा आढावा - जम्मू शहराच्या बाहेरील सुंजवान येथे दहशतवादी चकमक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा नवीन सुरक्षा आढावा घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली अधिक सुरक्षित करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. ही रॅली बहुस्तरीय सुरक्षा घेराखाली काढण्यात येणार आहे. गुप्तचर यंत्रणेचा आणखी विस्तार करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या सीमेत ड्रोन घुसण्याची शक्यता नाहीशी करण्यासाठीही कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. रॅलीत एक लाख लोक सहभागी व्हावेत यासाठी प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात येत आहे.
लोकांची कसून तपासणी - रॅलीच्या सुरक्षेशी संबंधित अधिकार्यांनी सांगितलं की, सांबा आणि आसपासच्या परिसरात पूर्ण सुरक्षेअंतर्गत बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक कार्यक्रमाचे ठिकाण सध्या सामान्य लोकांसाठी मर्यादित आहे. कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर चौक्या वाढवण्यात आल्या आहेत. महामार्ग आणि त्याच्या लगतच्या रस्त्यांवरील वाहने आणि लोकांना कसून तपासणी केल्यानंतरच पुढे जाण्याची परवानगी दिली जात आहे.
हेही वाचा - Terrorist Held In J-K : जम्मू-काश्मीर पोलिसांकडून जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवाद्याला अटक