ETV Bharat / bharat

नरेंद्र मोदी करणार जेएनयूतील विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरण - जेएनयूतील विवेकानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी जेएनयूतील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी टि्वट करून माहिती दिली आहे. विद्यापीठात माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यासमोर स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

मोदी
मोदी
author img

By

Published : Nov 12, 2020, 12:12 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील परिसरात उभारलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी टि्वट करून माहिती दिली आहे. सायंकाळी 6:30 वाजता हा कार्यक्रम होईल. वर्ष 2017 मध्ये कार्यकारी परिषदेच्या बैठकीत विद्यापीठात पुतळा बसविण्यास मान्यता देण्यात आली होती.

पुतळा उभारण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. 2017 मध्ये झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत स्वामी विवेकानंदांचा पुतळा आवारात स्थापित करण्यास मान्यता देण्यात आली होती. पुतळा 2019 मध्ये पूर्ण झाला, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील माजी विद्यार्थी डॉ. मनोज कुमार यांनी सांगितले.

विवेकानंद यांचा पुतळा जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यापेक्षा उंच -

माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यासमोर स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारण्यात आला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची उंची माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यापेक्षा सुमारे साडेतीन फूट उंच आहे.

विद्यापीठात कडक सुरक्षा -

या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून गायिका मालिनी अवस्थीही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. त्याचबरोबर या कार्यक्रमात अडथळा येऊ नये म्हणून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सुरक्षेची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.

मागीलवर्षी झाली होती पुतळ्याची तोडफोड -

गेल्यावर्षी शुल्कवाढीविरोधात विद्यापीठात आंदोलन सुरू होते. तेव्हा एका गटाने स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. तसेच एका गटाने पुतळ्याची विटंबना केली होती. तर पुतळ्याची विटंबना केल्यानंतर त्याच्याखाली भाजपविरोधात अपशब्द लिहण्यात आले होते.

हेही वाचा - पाकिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय; कर्नाटकातून एकाला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.