नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (रविवार) सकाळी 11 वाजता 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित केले. या वर्षातील हा तीसरा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मोदींनी आझादी का अमृत महोत्सव, जनता कर्फ्यू , कोरोना महामारी, लसीकरण, जपानमधील त्सुनामी, कृषी क्षेत्रातील विविध संधी, अशा अनेक मुद्यांवर मोदींनी भाष्य केले. देशात लसीकरण सुरू आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी 'दवाई भी - कडाई भी' मंत्र लक्षात ठेवावा, असे मोदी म्हणाले. तसेच दिवे लावणे, टाळ्या आणि थाळ्या वाजवणे, हे सगळे कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्शून गेले. त्यामुळेच पूर्ण वर्षभर ते, न थकता, न थांबता, चिकाटीने काम करत राहिले, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -
- पंतप्रधान मोदी यांनी भाषणाच्या सुरवातील होळी सणाच्या शुभेच्छा दिल्या. होळीच्या पवित्र अग्णीमध्ये कोरोना महामारी संकटाचे दहन होवो, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.
- 3 ऑक्टोबर 2014 ला ‘मन की बात’ कार्यक्रम सुरू झाला होता. त्या दिवशी ‘विजयादशमी’हा पवित्र सण होता. तर आज पाहा योगायोग ‘होलिका दहन’ आहे. “दिव्याने व्हावा दुसरा दिवा प्रज्वलित, आपले राष्ट्र व्हावे उज्वल, प्रकाशित.” ह्याच भावनेनें आपण मार्ग चालतो आहोत, असे मोदी म्हणाले.
- मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांशी बोललो. या माध्यमातून समाजाकडे बघण्याचा, समाजाला जाणून घेण्याचा, समाजाचे सामर्थ्य ओळखण्याचा हा अनुभव माझ्यासाठी देखील अद्भुत होता. ‘मन की बात’ च्या या 75 भागांमध्ये आपण अनेक विषय घेतले. सर्व श्रोत्याचे 'मन की बात' यशस्वी करण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी आणि ह्या कार्यक्रमाशी जोडलेले राहण्यासाठी मी आभार मानतो.
- आजचा मन की बात कार्यक्रमाचा 75 वा भाग आहे. तसेच हा स्वातंत्र्याची 75 वर्षे, 'अमृत महोत्सव' सुरू होणारा महिना आहे. दांडी यात्रेच्या दिवशी अमृत महोत्सव सुरु झाला आहे. हा महोत्सव 15 ऑगस्ट 2023 पर्यंत चालणार आहे. 'अमृत महोत्सव' देशाला एका नवीन उंचीवर नेईल, असे ते म्हणाले.
- तसेच मागील वर्षी याच मार्च महिन्यात जनता कर्फ्यू लागू केला होता. 'जनता कर्फ्यू’ हे शिस्तीचे एक अभूतपूर्व उदाहरण होते. कोरोना योद्धांच्याविषयी सन्मान, आदर, थाळ्या वाजवणे, टाळ्या वाजवणे, दिवा लावणे... हे सगळे कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्शून गेले. त्यामुळेच पूर्ण वर्षभर ते, न थकता, न थांबता, चिकाटीने काम करत राहिले. तसेच गेल्या वर्षी कोरोना लस कधी येणार हा प्रश्न होता. मात्र, आता देशात लसीकरण सुरू आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. लसीकरणा दरम्यान, कोरोनाशी लढा देण्याचा मंत्र पण नक्की लक्षात ठेवा. 'दवाई भी - कडाई भी', असे मोदी म्हणाले.
- याच मार्च महिन्यात जपानमध्ये आलेल्या महाभयंकर त्सुनामीला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या त्सुनामीत हजारो लोकांचा मृत्यू झाला होता, असे मोदी म्हणाले. तसेच त्यांनी कृषी क्षेत्रावर भाष्य केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, पारंपरिक शेतीबरोबरच नवीन पर्याय स्वीकारणे आवश्यक आहे. तितकेच आवश्यक आहे. पश्चिम बंगालच्या सुंदरबन परिसरातील नैसर्गिक सेंद्रिय मध देश-विदेशात प्रसिद्ध आहे, असे मोदींनी सांगितले.