ETV Bharat / bharat

कोव्हॅक्सिनला मान्यता दिल्याने पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे मानले आभार

COP26 मध्ये जागतिक नेते सहभागी झाले आहेत. या परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले, की आम्ही आमच्या धोरण आणि विकासांमधील मुख्य भागात अनुकूल बदल केले आहेत. भारतामध्ये नल से जल, स्वच्छ भारत मोहिम आणि उज्जवला योजनेने नागरिकांना फायदा मिळाला आहे.

मोदी स्कॉट यांची भेट
मोदी स्कॉट यांची भेट
author img

By

Published : Nov 1, 2021, 10:03 PM IST

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वातावरण परिषदेच्या कॉर्पोरेशन ऑफ पार्टीजमध्ये (COP26) सहभागी झाले आहेत. ही परिषद स्कॉटलंडमधील ग्लासगो शहरात ३१ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियाने कोव्हॅक्सिनला मान्यता दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रिलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचे आभार मानले आहेत.

COP26 मध्ये जागतिक नेते सहभागी झाले आहेत. या परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले, की आम्ही आमच्या धोरण आणि विकासांमधील मुख्य भागात अनुकूल बदल केले आहेत. भारतामध्ये नल से जल, स्वच्छ भारत मोहिम आणि उज्जवला योजनेने नागरिकांना फायदा मिळाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या राहणीमानात सुधारणा झाली आहे.

हेही वाचा-संरक्षण विभागासाठी एक मजबूत शस्त्र बनू शकतो 'ROBO Xena 5.0'

अनेक पांरपरिक समुदायांना एकतेने निसर्गासोबत राहण्याचे ज्ञान होते. हे ज्ञान पुढील पिढीपर्यंत जाण्यासाठी त्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करायला पाहिजे. स्थानिक भागाप्रमाणे जीवनशैलीचे संरक्षण असायला हवे. हा अनुकूलनामधील महत्त्वाचा भाग आहे.

हेही वाचा- युपीची आगामी विधानसभा निवडणूक लढविणार नाही- अखिलेश यादव

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोरीस जॉन्सन यांची घेतली भेट

पंतप्रधान मोदींनी जागतिक नेत्यांच्या परिषदेत इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची भेट घेतली. दोन्ही पंतप्रधानांनी 2023 पर्यंतच्या रोडमॅपच्या प्राधान्यक्रम आणि अंमलबजावणीची चर्चा केली. त्यामध्ये व्यापार आणि अर्थव्यवस्था, लोकांपासून लोकापर्यंत, आरोग्य संरक्षण आणि सुरक्षा अशा विषयांचा मुख्यत्वे समावेश होता. दोन्ही नेत्यांनी व्यापारांमधील भागीदारीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. अफगाणिस्तान, दहशतवादविरोधात लढा, प्रादेशिक आणि जागतिक आव्हाने, पुरवठा साखळी, कोरोनानंतर अर्थव्यवस्था सावणरे या मुद्द्यांवरही दोन्ही पंतप्रधानांनी चर्चा केल्याचे परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा- योगी सरकारविरोधात प्रियंका गांधींसह भाजपचे खासदार वरुण गांधींचे आव्हान, गांधी परिवाराची होणार एकजूट?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.